सोसायट्याच होणार विकासक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 06:56 AM2017-12-10T06:56:35+5:302017-12-10T06:56:45+5:30

हाउसिंग सोसायट्यांनाच आता विकासक बनविणाºया, मुंबई बँकेच्या स्वयं-पुनर्विकास योजनेचे सादरीकरण नुकतेच म्हाडाच्या वरिष्ठ अधिका-यांसमोर झाले.

 Society will be the only developers | सोसायट्याच होणार विकासक

सोसायट्याच होणार विकासक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हाउसिंग सोसायट्यांनाच आता विकासक बनविणाºया, मुंबई बँकेच्या स्वयं-पुनर्विकास योजनेचे सादरीकरण नुकतेच म्हाडाच्या वरिष्ठ अधिका-यांसमोर झाले. तेव्हा ही योजना अधिक गतिमान करण्यासाठी यातील प्रस्तावांना प्राध्यान्याने मंजुरी देण्यात येईल, असे स्पष्ट करत, जनतेच्या प्रकल्पांसाठी ‘एक खिडकी योजना’ राबविण्याची उत्सुकताही म्हाडाच्या अधिकाºयांनी दर्शविली. त्यामुळे विविध कारणांनी रखडलेल्या जुन्या इमारतींच्या स्वयं-पुनर्विकासाला चालना मिळणार असून, मुंबईतील १० हजारांपेक्षा जास्त हाउसिंग सोसायट्यांना त्याचा फायदा होईल.
हाउसिंग सोसायटी पुनर्विकासात अडथळा येतो, तो म्हाडाकडून मिळत असलेल्या मंजुरीचा. एनओसीसाठी आधी म्हाडाला पैसे भरावे लागतात. मग पालिकेच्या मंजुरीसाठी वाट पाहात राहावे लागते. ही अडथळ्यांची शर्यत दूर करण्यास म्हाडाच्या मंजुरी प्रक्रियेत बदल सुचविणारी उपाययोजना बँकेने सादरीकरणाद्वारे मांडली. त्यानंतर, त्याला म्हाडानेही तत्त्वत: मान्यता दिली आहे. तसा बदल म्हाडाने पुनर्विकास प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेत केल्यास, कोणत्याही म्हाडा जमिनीवरील सोसायटीचा स्वयं पुनर्विकास मार्गी लागण्यास मदत होणार आहे. या वेळी म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी सुभाष लाखे यांच्यासमोर हे सादरीकरण झाले. या वेळी बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, संचालक नंदकुमार काटकर, नितीन बनकर, आनंदराव गोळे, विठ्ठल भोसले, सरव्यवस्थापक डी. एस. कदम आदी उपस्थित होते.

विविध तज्ज्ञांच्या मदतीने स्वत: सोसायटीच विकससक म्हणून काम करणार असून, मुंबई बँक त्यांना आवश्यक तो निधी कमी व्याजदराने उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येक सभासदाचा या प्रक्रियेत सहभाग असेल, त्यामुळे कामाचा दर्जा, पारदर्शकता राहील आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होईल. त्यासाठी या योजनेतील प्रकल्पाना येणारे अडथळे दूर करून, तातडीने मंजुरी देण्याबाबत म्हाडाचा प्रयत्न राहील.
- मिलिंद म्हैसकर, उपाध्यक्ष, म्हाडा.

रहिवासी एक झाले आणि स्वत:च पुनर्विकास केला, तर त्यांना हवी तशी मोठी घरे, चांगला बांधकाम दर्जा आणि वेळेत काम पूर्ण होऊ शकते. शिवाय अतिरिक्त एफएसआयच्या विक्रीतून प्रचंड नफा विकासकाऐवजी सोसायटीला मिळेल. म्हणजेच सोसायटी स्वत:च विकासक होईल आणि मुंबई बँक त्यांना आवश्यक ते अर्थसहाय अल्प व्याजदराने पुरवेल.
- प्रवीण दरेकर,
अध्यक्ष, मुंबई बँक.

Web Title:  Society will be the only developers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई