एटीएम फोडून केबिनमध्ये झोपण्याचे सोंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 06:31 AM2018-03-30T06:31:17+5:302018-03-30T06:31:17+5:30

एटीएम मशीन फोडून त्यातले पैसे काढून घेतले. मात्र

Sleeping in the cabin breaks the ATM | एटीएम फोडून केबिनमध्ये झोपण्याचे सोंग

एटीएम फोडून केबिनमध्ये झोपण्याचे सोंग

Next

गौरी टेंबकर-कलगुटकर 
मुंबई : एटीएम मशीन फोडून त्यातले पैसे काढून घेतले. मात्र पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो चोर त्याच केबिनमध्ये अंगावर चादर ओढून झोपल्याचे सोंग करू लागला. मात्र दहिसर पोलिसांसमोर त्याचे हे नाटक पुरते अपयशी ठरले. त्यामुळे पोलिसांनी या चोरट्याच्या मुसक्या आवळत गुन्हा दाखल केला.
शकीर साबीर शेख (२५) असे चोराचे नाव आहे. दहिसर
पूर्वच्या रावळपाडा परिसरात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये दोन मशीन्स आहेत. बुधवारी रात्री साडेतीनच्या सुमारास या दोन्ही मशीन्समध्ये पैसे निघणारा भाग शेख याने टायरचे पंक्चर काढण्याच्या कटवणीच्या साहाय्याने फोडला. त्यानंतर त्यातून एकूण एक-एक, दोन-दोन करत ४२ हजारांची रोकड काढली. ही बाब एका स्थानिकाने पाहिली आणि याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. रावळपाडा हा परिसर दहिसर पोलिसांच्या हद्दीत येतो. त्यामुळे त्यांचे एक पथक लगेचच घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा दोन्ही एटीएम फोडल्याचे त्यांनी पाहिले. मात्र एटीएममधून कोणीही बाहेर पळताना त्यांना दिसले नाही. तेव्हा एक इसम डोक्यावर चादर घेऊन एटीएम केबिनमध्ये झोपला होता. त्यामुळे त्याच्याकडे चौकशी करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी त्याला उठवले. तेव्हा तो पूर्ण नशेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्याच्याकडेच पोलिसांना सर्व पैसे सापडले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
शेखला अटक केली असून त्याने यापूर्वी असा काही प्रकार केलाय का? याची चौकशी पोलीस करत असल्याचे परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Sleeping in the cabin breaks the ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.