राज्यातून सहा जण राज्यसभेवर बिनविरोध, रहाटकर यांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 06:42 AM2018-03-16T06:42:13+5:302018-03-16T06:42:13+5:30

विधानसभेतून राज्यसभेवर पाठवावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक अखेर भाजपाच्या विजया रहाटकर यांच्या माघारीमुळे बिनविरोध झाली. भाजपाच्या विजया रहाटकर माघार घेणार, असे वृत्त लोकमतने यापूर्वीच दिले होते.

Six people withdrawn from Rajya Sabha, Rajkumar | राज्यातून सहा जण राज्यसभेवर बिनविरोध, रहाटकर यांची माघार

राज्यातून सहा जण राज्यसभेवर बिनविरोध, रहाटकर यांची माघार

Next

मुंबई : विधानसभेतून राज्यसभेवर पाठवावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक अखेर भाजपाच्या विजया रहाटकर यांच्या माघारीमुळे बिनविरोध झाली. भाजपाच्या विजया रहाटकर माघार घेणार, असे वृत्त लोकमतने यापूर्वीच दिले होते. रहाटकर यांचा अर्ज त्यांचे प्रतिनिधी म्हणून संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी मागे घेतला व सहा जणांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
>राज्यसभेवर बिनविरोध निवडून जाणारे
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर
माजी मुख्यमंत्री
नारायण राणे
केरळ भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष
व्ही. मुरलीधरन (भाजपा)
राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण
शिवसेनेचे अनिल देसाई
ंंकाँग्रेसचे कुमार केतकर
>राणेंनी सेनेला डिवचले
मला राज्यसभेची संधी भाजपाने दिली, तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असे मी वाचले होते. आता मी खासदार झालो आहे. कदाचित शिवसेना उद्यापासून सत्तेत नसेल, असे सांगत नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचले. काँग्रेसमध्ये मी करमून घेतले तसे भाजपामध्येही घेईन.
भाजपा व मी एकमेकांची गरज असेल तशी ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करू. मी दिल्लीत स्थिरावेन का हे आताच सांगता येत नाही. मी एकाच जागी स्थिर राहीन का हेही सांगता येत नाही, अशी टिप्पणीही राणे यांनी केली.

Web Title: Six people withdrawn from Rajya Sabha, Rajkumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.