मीटर बॉक्सला लागलेल्या आगीमुळे ६ जण गुदमरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 06:14 AM2019-07-20T06:14:51+5:302019-07-20T06:15:15+5:30

आपत्कालीन घटनांचे सत्र सुरूच असून, शुक्रवारी पहाटे बोरीवली येथील एका हाउसिंग सोसायटीच्या मीटर बॉक्सला लागलेल्या आगीमुळे सहा जण गुदमरले.

Six people died due to a fire in a meter box | मीटर बॉक्सला लागलेल्या आगीमुळे ६ जण गुदमरले

मीटर बॉक्सला लागलेल्या आगीमुळे ६ जण गुदमरले

googlenewsNext

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आपत्कालीन घटनांचे सत्र सुरूच असून, शुक्रवारी पहाटे बोरीवली येथील एका हाउसिंग सोसायटीच्या मीटर बॉक्सला लागलेल्या आगीमुळे सहा जण गुदमरले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बोरीवली पश्चिमेकडील एक्सर रोडवरील शिव तपस्या हाउसिंग सोसायटी येथे मीटर बॉक्सला आग लागून सहा जण गुदमरल्याची घटना घडली. त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अशोक सुर्वे, वैशाली सुर्वे, ऐश्वर्या, प्रियंका, रूपाली पवार आणि ऐश्वर्या अशी या दुर्घटनेतील सहा जणांची नावे आहेत. यापैकी ऐश्वर्या, प्रियंका, रुपाली पवार आणि ऐश्वर्या यांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. तर, अशोक आणि वैशाली यांच्यावर उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
>जोगेश्वरीत सिलिंग कोसळले; मुलगी जखमी
जोगेश्वरी पश्चिम येथील अमृतनगरमधील इमारत क्रमांक १० मधील रूम नंबर ४०८ च्या सिलिंगचा भाग गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास कोसळला. यात फरहाद खान ही १२ वर्षांची मुलगी जखमी झाली. खासगी रुग्णालयात उपचार करून तिला घरी पाठविण्यात आले.
नऊ ठिकाणी शॉर्टसर्किट
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पडझडीच्या घटना सुरूच आहेत. शुक्रवारी शहरात २, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ६ अशा प्रकारे एकूण ९ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.
शहरात १, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण ५ ठिकाणी झाडे पडली. पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण ४ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला.

Web Title: Six people died due to a fire in a meter box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.