बहिण लहान भावाला झोपताना अश्लील व्हिडिओ दाखवायची; लैेंगिक संबंधही ठेवले, मुंबईतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 12:10 PM2021-08-26T12:10:01+5:302021-08-26T12:11:41+5:30

संबंधित भाऊ आणि बहिणीचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Sister showing pornographic videos to younger brother while sleeping; Also kept lagging ties, incident in Mumbai | बहिण लहान भावाला झोपताना अश्लील व्हिडिओ दाखवायची; लैेंगिक संबंधही ठेवले, मुंबईतील घटना

बहिण लहान भावाला झोपताना अश्लील व्हिडिओ दाखवायची; लैेंगिक संबंधही ठेवले, मुंबईतील घटना

googlenewsNext

मुंबई: राज्यभरात नुकतंच रक्षाबंधन पार पडलं. मात्र याचदरम्यान भाऊ आणि बहिणीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. लहान भावाला अश्लील व्हिडिओ दाखवून बहिणीने लैगिंग संबंध ठेवल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील कुरार भागत ही घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित १६ वर्षीय मुलीला अश्लील व्हिडीओ पाहण्याचं व्यसन होतं. दरम्यान ती आपल्या मोबाईलवर १३ वर्षीय भावाला झोपताना अश्लील व्हिडिओ दाखवायची. त्यानंतर ती आपल्या भावावर दबाब टाकून त्याला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायची. मागील बऱ्याच दिवसांपासून हा संतापजनक प्रकार सुरू होता. संबंधित घटनेतून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. गर्भवती राहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी संबंधित भावाची चौकशी केल्यानंतर संबंधित मुलगी खरं बोलत असल्याची माहिती उघड झाली. जेव्हा तो लैंगिक संबंध ठेवण्यास नकार द्यायचा, तेव्हा त्याची बहिण त्याला मारहाण करण्याची आणि घटनेची वाच्यता करण्याची धमकी द्यायची, अशी माहिती पीडित मुलाने दिली. 

संबंधित भाऊ आणि बहिणीचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित अल्पवयीन भावाला बाल सुधारगृहात पाठवलं आहे. तर संबंधित तरुणी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलीस सध्या आई वडिलांची डीएनए चाचणी करत आहे. डिएनचा रिपोर्ट आल्यानंतर या घटनेबाबत अधिक माहिती समोर येईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास कुरार पोलीस करत आहेत.

Web Title: Sister showing pornographic videos to younger brother while sleeping; Also kept lagging ties, incident in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.