भटक्या कुत्र्यांसाठी एकच डॉग व्हॅन

By Admin | Published: April 12, 2015 01:50 AM2015-04-12T01:50:18+5:302015-04-12T01:50:18+5:30

नगरसेवकांनी या मुद्द्यावर हल्लाबोल करताच आरोग्य अधिकाऱ्यांनी मागील ११ वर्षात कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आलेल्याची संख्या सांगितली.

Single dog van for duck dogs | भटक्या कुत्र्यांसाठी एकच डॉग व्हॅन

भटक्या कुत्र्यांसाठी एकच डॉग व्हॅन

googlenewsNext

ठाणे : मुंब्य्रात लहान मुलाला कुत्र्याने चावा घेतल्याचे प्रकरण पुन्हा एकदा महासभेत चांगलेच गाजले. नगरसेवकांनी या मुद्द्यावर हल्लाबोल करताच आरोग्य अधिकाऱ्यांनी मागील ११ वर्षात कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आलेल्याची संख्या सांगितली. मात्र आरोग्य अधिकारी सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेत्यांनी याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याचवेळी शहरात १० प्रभागसमित्यांमधील भटके कुत्रे पकडण्यासाठी एकच डॉग र्व्हन असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
ठाणे महापालिकेचे विरोधीपक्षनेते हणमंत जगदाळे यांनी ठाणे महापालिकेच्या हद्दीतील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा विषय शुक्र वारच्या महासभेत उपस्थित केला. यावेळी शहरात कशा प्रकारे या कुत्र्यांनी दहशत पसरवली आहे, याची माहिती सभागृहाला दिली. तसेच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात ठाणे महापालिकेचे आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप जगदाळे यांनी केला. याच मुद्द्यावर सेनेच्या नगरसेविका एकता भोईर यांनीही आपल्या प्रभागात चार दिवसात चार जणांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तसेच आपल्याच प्रभागात ठाणे महापालिकेच निर्बीजीकरण केंद्र असल्याने येथे आणलेले कुत्रे शस्त्रक्रियेनंतर तेथेच सोडून देण्यात
येत असल्याने त्यांची संख्या वाढत आहे. (प्रतिनिधी)

च्आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी सांगितले की आतापर्यंत २००४ पासून ४४ हजार ६७७ कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले आहे, तसेच मागील २० वर्षात रॅबीजच्या एकाही केसच नोंद झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
च्आजच् ठाणे महापालिकेकडे या भटक्या कुत्र्यांना पकडणाऱ्या दोन डॉग व्हॅन आहेत. मात्र त्यातील एक व्हॅन मागील आठ महिन्यांपासून नादुरु स्त आहे आणि एकच गाडी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी आहे.

Web Title: Single dog van for duck dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.