Chalo Jeete Hain : पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील लघुपट शाळांमध्ये दाखवा, राज्य शासनाचा फतवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 09:06 AM2018-09-12T09:06:38+5:302018-09-12T09:28:22+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'चलो जीते हैं' हा लघुपट राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखवण्यात येणार आहे. शाळांमध्ये लघुपट दाखवण्याचा निर्णय राज्य शासनाचा आहे.

short film chalo jeete hain based on pm narendra modi;s life will show in maharashtra school | Chalo Jeete Hain : पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील लघुपट शाळांमध्ये दाखवा, राज्य शासनाचा फतवा

Chalo Jeete Hain : पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील लघुपट शाळांमध्ये दाखवा, राज्य शासनाचा फतवा

Next

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'चलो जीते हैं' हा लघुपट राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखवण्यात येणार आहे. शाळांमध्ये लघुपट दाखवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. जिल्हाप्रमुख, शिक्षणाधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिक्षकांना यासंबंधीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. काही शिक्षकांनी यावर आक्षेप नोंदवल्यानंतर, अशा कोणत्याही सूचना शाळांना आमच्याकडून दिल्या गेलेल्या नाहीत, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.  

18 सप्टेंबरला elearning.parthinfotech.in  या संकेतस्थळावर हा लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत शाळांमध्ये हा लघुपट दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक एमबीपीएस इंटरनेट स्पीड हवा, सर्व शाळांनी या लघुपटाच्या प्रक्षेपणासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटरची सोय करायची आहे, असेही शाळांना सांगण्यात आले आहे.
मंगेश हडवळे दिग्दर्शित 'चलो जीते हैं'  लघुपट 32 मिनिटांचा आहे. हा लघुपट जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानेही पाहिला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तो दाखवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  

Web Title: short film chalo jeete hain based on pm narendra modi;s life will show in maharashtra school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.