‘शिवशाही’तही आता ‘आवडेल तेथे प्रवास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:57 AM2017-12-06T01:57:31+5:302017-12-06T01:57:41+5:30

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाहीच्या वाढत्या संख्येनंतर प्रवासीभिमुख योजना आणण्यास सुरुवात केली. यानुसार आता शिवशाहीतील प्रवासीसंख्या वाढवण्यासाठी ‘आवडेल तेथे प्रवास’ ही योजना लागू केली आहे

'Shivshahi' now also 'Travel there like' | ‘शिवशाही’तही आता ‘आवडेल तेथे प्रवास’

‘शिवशाही’तही आता ‘आवडेल तेथे प्रवास’

Next

मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाहीच्या वाढत्या संख्येनंतर प्रवासीभिमुख योजना आणण्यास सुरुवात केली. यानुसार आता शिवशाहीतील प्रवासीसंख्या वाढवण्यासाठी ‘आवडेल तेथे प्रवास’ ही योजना लागू केली आहे. योजनेंतर्गत प्रवाशांना ४ किंवा ७ दिवसांचा पास घेत राज्यासह आंतरराज्य प्रवास करण्याची मुभा आहे. वातानुकूलित शिवशाही वगळता अन्य एसटीमध्ये ही सेवा लागू होती. आता शिवशाहीचा समावेशदेखील या योजनेत करण्यात आला आहे.
वातानुकूलित आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज अशा २००० शिवशाही एसटीच्या ताफ्यात येणार आहेत. सद्य:स्थितीत एसटीच्या ताफ्यात १०७ हून जास्त शिवशाही आहेत. या एसटी मुंबई-कोल्हापूर, पुणे-लातूर, मुंबई-लातूर, मुंबई-रत्नागिरी अशा अनेक मार्गांवर धावत आहेत. खासगी बसला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने ५०० स्व-मालकीच्या आणि १५०० शिवशाही भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. ‘आवडेल तेथे प्रवास’ ही योजना यापूर्वी एसटी महामंडळाच्या अन्य बसमध्ये लागू होती. यात साधी, जलद, आराम, रात्रसेवा, शहरी, हिरकणी यांचा समावेश आहे.
आवडेल तेथे प्रवास योजनेंतर्गत प्रवाशांना ४ किंवा ७ दिवसांचा पास मिळणार आहे. या पासवर राज्यभर प्रवास करता येणार आहे. पाससाठी गर्दीचा हंगाम आणि कमी गर्दीचा हंगाम असे दोन प्रकार आहेत. राज्यासह आंतरराज्य प्रवासासाठीदेखील हा पास वैध ठरणार आहे. ही योजना तत्काळ राबवावी, असे परिपत्रक एसटीच्या वाहतूक विभागाने काढले आहे, एसटी महामंडळातर्फे राज्यातील सर्व संबंधित विभागांना पाठवले आहे. नवीन पास उपलब्ध होईपर्यंत सध्या वापरात असलेल्या निमआराम बससेवेच्या पासांच्या मूल्यातील तफावत आकारण्यात यावी, असे एसटीच्या परिपत्रकात महामंडळाने स्पष्ट केले .

गर्दीचा कालावधी- १५ आॅक्टोबर ते १४ जून
कमी गर्दीचा कालावधी- १५जून ते १४ आॅक्टोबर
७ दिवसांचा पास
बसचा प्रकार गर्दीचा काळ कमी गर्दीचा काळ
प्रौढ मुले प्रौढ मुले
शिवशाही आसनी १७८०-८९० (रु.) १६४२-८२५ (रु.)
शिवशाही आंतरराज्य १९२०-९६० (रु.) १७८०-८९० (रु.)
४ दिवसांचा पास
बसचा प्रकार गर्दीचा हंगाम कमी गर्दीचा हंगाम
प्रौढ - मुले प्रौढ मुले
शिवशाही आसनी १०२०-५१० (रु.) ९४०-४७० (रु.)
शिवशाही आंतरराज्य ११००-५५० (रु.) १०२०-५१० (रु.)

Web Title: 'Shivshahi' now also 'Travel there like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.