दीड शहाण्यांनी नुसतेच तोंडाचे डबडे वाजवू नये; राज ठाकरेंना शिवसेनेचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 09:00 AM2018-10-25T09:00:20+5:302018-10-25T09:42:52+5:30

राज्यात दुष्काळाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सत्तेत राहून काय करतेय, असा सवाल केला होता.

shivsena hits back raj thakarey comment in editorial on drought | दीड शहाण्यांनी नुसतेच तोंडाचे डबडे वाजवू नये; राज ठाकरेंना शिवसेनेचे प्रत्युत्तर

दीड शहाण्यांनी नुसतेच तोंडाचे डबडे वाजवू नये; राज ठाकरेंना शिवसेनेचे प्रत्युत्तर

Next

मुंबई : राज्यात दुष्काळाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सत्तेत राहून काय करतेय, असा सवाल केला होता. त्याला शिवसेनेने मुखपत्र सामनामधून प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते, असे उगाचच तोंडाचे डबडे वाजवत राहणाऱ्या दीड शहाण्यांनी दुष्काळाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेने उठवलेला आवाज आधी समजून घ्यावा, असे म्हटले आहे. 


सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले आहे. राज्यावर दुष्काळ ही मोठी आपत्ती कोसळली आहे. ही काही श्रेय घेण्याची लढाई नव्हे, असे म्हणत शिवसेनेने भाजपचेही कान टोचले आहेत. 


तसेच जलाशये, छोटी-मोठी धरणे, पावसाळाअखेरीसच कोरडी पडली आहेत. त्यातून कंत्राटदारांचे खिसे जरूर गरम झाले, पण भूगर्भातील पाणीपातळी काही वाढली नसल्याची टीकाही अग्रलेखात करत राज्य सरकारचा नाकर्तेपणावर प्रकाश टाकला आहे. 


दुष्काळ जाहीर करण्य़ासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल करत शेतजमिनींचे हे वाळवंट उघड्या डोळ्यांनी धडधडीत दिसत असताना ‘दुष्काळसदृश’ आणि सरकार ‘अदृश्य’ असा खेळ का मांडला जात आहे? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. 

Web Title: shivsena hits back raj thakarey comment in editorial on drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.