दादरमध्ये उत्तर भारतीयाला शिवसेनेने चोपले; रस्त्यावर स्टॉल लावण्यावरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 17:03 IST2018-10-25T10:13:51+5:302018-10-25T17:03:23+5:30
काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुंबईला उपाशी ठेवण्याचे केलेले वक्तव्य ताजे असतानाचा हा प्रकार घडला आहे.

दादरमध्ये उत्तर भारतीयाला शिवसेनेने चोपले; रस्त्यावर स्टॉल लावण्यावरून वाद
मुंबई : दादरमध्ये रस्त्यावर स्टॉल लावून वाहतुकीची अडवणूक करणाऱ्या उत्तर भारतीयांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी मारहाण केली.
काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुंबईला उपाशी ठेवण्याचे केलेले वक्तव्य ताजे असतानाचा हा प्रकार घडला आहे. गेल्या महिन्यात गुजरातमध्ये एका मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणावरून 50 हजार उत्तर भारतीयांना गुजरातबाहेर हाकलून दिले होते. या प्रकरणावरून निरुपम यांनी उत्तर भारतीयांनी ठरवले तर मुंबईला उपाशी ठेवू शकतात, असे वक्तव्य केले होते.
यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी उत्तर भारतीयांना चोप दिला होता. बुधवारी दादरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यात स्टॉल लावत असल्याच्या कारणातून उत्तरभारतीयांना मारहाण केली. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.