मुंबई - शारदा थिएटर बंद होण्याच्या मार्गावर, मराठी चित्रपटांच्या सिल्व्हर ज्युबलीचं साक्षीदार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 01:20 PM2017-12-04T13:20:27+5:302017-12-04T19:28:44+5:30

मध्य मुंबईतील एक महत्वाचं मानलं जाणार शारदा चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकेकाळी मराठी चित्रपटांच्या सिल्व्हर ज्युबलीचं साक्षीदार असणारं हे चित्रपटगृह जवळपास 45 वर्षांनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. 

Sharda Theater to shut down after 45 years | मुंबई - शारदा थिएटर बंद होण्याच्या मार्गावर, मराठी चित्रपटांच्या सिल्व्हर ज्युबलीचं साक्षीदार 

मुंबई - शारदा थिएटर बंद होण्याच्या मार्गावर, मराठी चित्रपटांच्या सिल्व्हर ज्युबलीचं साक्षीदार 

Next
ठळक मुद्देदादरमधील शारदा चित्रपटगृह बंद होण्याची शक्यता कॉन्ट्रॅक्ट रिन्यू न झाल्याने शारदा थिएटर बंद करण्याचा निर्णय1972 साली हे चित्रपटगृह सुरु झालं होतं

मुंबई - दादर परिसरात असलेल्या चित्रपटगृहांमधील एक ओळखीचं नाव म्हणजे शारदा चित्रपटगृह. मुंबईत आणि खासकरुन दादर परिसरात राहणा-या व्यक्तीला हे चित्रपटगृह माहित नसणं म्हणजे तसं दुर्मिळच. दादरमधील एक लॅण्डमार्क असलेलं शारदा चित्रपटगृह बंद होण्याची शक्यता आहे. मध्य मुंबईतील एक महत्वाचं मानलं जाणार हे चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकेकाळी मराठी चित्रपटांच्या सिल्व्हर ज्युबलीचं साक्षीदार असणारं हे चित्रपटगृह जवळपास 45 वर्षांनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्ट्रॅक्ट रिन्यू न झाल्याने शारदा थिएटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 नोव्हेंबरला हा कॉन्ट्रॅक्ट संपला आहे. 1972 साली हे चित्रपटगृह सुरु झालं होतं. मुंबई मराठी ग्रंथलायाकडे सध्या चित्रपटगृहाचा ताबा आहे. 

जुन्या पिढीच्या अनेक आठवणी या चित्रपटगृहाशी जोडलेल्या आहेत. एकेकाळी मराठी चित्रपट पाहण्यासाठी या चित्रपटगृहाबाहेर रांग लागलेली असायची. भारतमाता आणि शारदा थिएटर त्यावेळी मराठी प्रेक्षकांचं हक्काचं चित्रपटगृह होतं. दादरमधल्या मराठी माणसांची तर इथे नेहमी गर्दी असायची. ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांनी येथे मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. रामराम गंगाराम, ह्योच नवरा हवा यांसारखे चित्रपट इथे रिलीज झाले. या मराठी चित्रपटांनी इथे सिल्व्हर ज्युबली केली. त्याआधी हे चित्रपटगृह हिंदी सिनेमांसाठी ओळखलं जायचं. नमक हराम, यादों की बारात, शर्मिली यांसारखे हिंदी चित्रपट इथे प्रदर्शित झाले होते.

पण काळासोबत चित्रपटगृह मागे पडत गेलं. एकीकडे मल्टिप्लेक्सची गर्दी होत असताना, शारदा चित्रपटगृह मात्र आपल्या जुन्या ओळखीतच अडकून होतं. गेल्या काही वर्षांपासून तर इथे हिंदी आणि मराठीपेक्षा भोजपुरी चित्रपटच जास्त लागू लागले होते. तिकीट दरही परवडणारे असल्याने उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात चित्रपट पहायला गर्दी करत होते. पण आता या थिएटरला टाळे लागण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Sharda Theater to shut down after 45 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई