ठरलं! माढ्यातून शरद पवारच लढवणार लोकसभा निवडणूक?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 02:37 PM2019-02-13T14:37:05+5:302019-02-13T14:39:00+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केल्यानंतर ते कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Sharad Pawar will contest Lok Sabha elections from the Madha | ठरलं! माढ्यातून शरद पवारच लढवणार लोकसभा निवडणूक?

ठरलं! माढ्यातून शरद पवारच लढवणार लोकसभा निवडणूक?

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केल्यानंतर ते कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेतशरद पवार हे माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून, त्याबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीशरद पवार यांनी माढा मतदारसंघातून याआधी २००९ मध्ये निवडणूक लढवली होती. तेव्हा ५,३०,५९६ इतकी मते मिळवून ते विजयी झाले होते.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केल्यानंतर ते कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अखेर आज शरद मतदारसंघावरही शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. शरद पवार हे माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून, त्याबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

 माढा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून तर्कवितर्क लढवण्यात येत होते. तसेच विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनीही शरद पवार यांच्यासाठी जागा सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. 

शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून याआधी २००९ मध्ये निवडणूक लढवली होती. तेव्हा ५,३०,५९६ इतकी मते मिळवून ते विजयी झाले होते. या वेळी भाजपाच्या सुभाष देशमुख यांचा त्यांनी पराभव केला होता. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर तिसऱ्या क्रमांकावर होते.पवार यांनी साधारण ५७ टक्के मते मिळवली होती. 

त्यानंतर २०१४ मध्ये या मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनाही ४,८९,९८९ इतकी मते मिळाली होती. तर सदाभाऊ खोत यांना ४,६४,६४५ मते मिळाली होती. या वेळी केवळ सुमारे २५ हजार मतांनी विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. या ठिकाणी सदाभाऊ खोत यांना भाजपाचा पाठिंबा होता. त्यामुळेच त्यांना इतकी मते मिळाली होती. तसेच २००९ मध्येही या ठिकाणी भाजपा दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे २०१९ मध्ये होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी ताकद लावावी लागणार असून, या ठिकाणी दिग्गज उमेदवारच बाजी मारू शकेल, अशी स्थिती आज आहे. आता कोणाचीच खात्री नसल्याने पवार यांनाच खुद्द या ठिकाणी उभे करावे, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: Sharad Pawar will contest Lok Sabha elections from the Madha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.