Sewadi-Nava Sheva Marg, on the rock, cost Rs. 5612 crores | शिवडी-नाव्हा शेवा मार्ग खडकावर, खर्च ५६१२ कोटी रुपये

मुंबई : शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकच्या दुस-या भागातील सर्वात लांब पुल खडकाच्या भुग्यावर उभारला जाणार आहे. अत्याधुनिक रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रीलचा उपयोग यासाठी केला जाणार आहे. टाटा-देव्हू यांच्या संयुक्त कंपनीला या ५६१२ कोटींच्या बांधकामाचे कंत्राट मिळाले आहे.
ठाणे-नवी मुंबई या रेल्वे ट्रान्स हार्बर लिंकचा दुसरा टप्पा म्हणून शिवडी ते नाव्हा शेवा मार्गाकडे पाहिले जात आहे. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यासाठी १७ हजार ८४३ कोटी रुपये खर्चाचा आराखडा बांधला आहे. याअंतर्गत एकूण १०.३८ लांबीचे पुल दोन टप्प्यात समुद्रावर उभारले जाणार आहेत. संपूर्ण प्रकल्प तीन भागात पूर्ण केला जाणार असून, तिन्ही भागांंसाठी एकत्र निविदा काढण्यात आल्या. यापैकी दुसºया भागासाठीचे कंत्राट टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड व देव्हू ई अ‍ॅण्ड सी याच्या संयुक्त कंपनीने मिळवले आहे.
दुसºया भागात ७.८ किमी लांबीचा सर्वात मोठा सागरी पुल उभारला जाणार आहे. त्यासाठी टाटाने अत्याधुनिक रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रीलचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पुलाचा खांब उभा करण्यासाठी समुद्रात खडक लागताच त्या खडकालाच ड्रील केले जाते. त्याचा भुगा पाण्यात मिसळला जातो. त्यानंतर दाबयुक्त हवेच्या माध्यमातून ते मिश्रण जमिनीवर आणले जाऊन त्यावर पुल उभा केला जातो. यामुळे वेळ तर वाचतो आणि जमिनीत अधिक खोलवर जाऊन खांब उभा करणे शक्य होते.

मुंबईत विशेष इंटरचेंज : ‘आर्थोट्रॅपिक स्टील डेक स्ट्रक्चर’द्वारे पुलाची मुख्य उभारणी होईल. त्यासाठी खास जपानहून पोलाद आयातीचा निर्णय टाटा प्रोजेक्ट्सने घेतला आहे. शिवडी-नाव्हा शेवा ट्रान्स हार्बर लिंकच्या या दुसºया भागात नवी मुंबईतील शिवाजीनगर येथे विशेष इंटरचेंजसुद्धा उभारले जाणार आहे.