‘ब्रेक टेस्ट’ ट्रॅकसाठी सात महिन्यांची मुदत, अन्य जिल्ह्यांना एक महिन्याची मुदत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 04:39 AM2017-09-16T04:39:29+5:302017-09-16T04:39:47+5:30

मुंबईतील चारही आरटीओंना २५० मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्यासाठी, उच्च न्यायालयाने सात महिन्यांची मुदत दिली आहे, तर अन्य जिल्ह्यांतील आरटीओंना ३१ आॅक्टोबरपर्यंत ट्रॅक उपलब्ध करून देण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले आहेत.

The seven-month deadline for a 'break test', one month term for other districts | ‘ब्रेक टेस्ट’ ट्रॅकसाठी सात महिन्यांची मुदत, अन्य जिल्ह्यांना एक महिन्याची मुदत  

‘ब्रेक टेस्ट’ ट्रॅकसाठी सात महिन्यांची मुदत, अन्य जिल्ह्यांना एक महिन्याची मुदत  

Next

मुंबई : मुंबईतील चारही आरटीओंना २५० मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्यासाठी, उच्च न्यायालयाने सात महिन्यांची मुदत दिली आहे, तर अन्य जिल्ह्यांतील आरटीओंना ३१ आॅक्टोबरपर्यंत ट्रॅक उपलब्ध करून देण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले आहेत. या दिलेल्या मुदतवाढीत काम पूर्ण न झाल्यास आरटीओ बंद करण्यात येतील, अशी तंबी परिवहन विभागाला न्यायालयाने दिली आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार, वाहनांची ब्रेक टेस्ट करताना, टेस्ट ट्रॅक २५० मीटर असणे बंधनकारक आहे. मात्र, राज्यात या नियमाला सर्रासपणे धाब्यावर बसवून, वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक आरटीओमध्ये या नियमाचे पालन केले जावे, यासाठी पुण्याचे रहिवासी श्रीकांत कर्वे यांनी जनहित याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे होती. सुनावणीवेळी केंद्राच्या नियमांप्रमाणे वाहनांची चाचणी होते की नाही, हे पाहण्यासाठी सरकारकडे काय यंत्रणा आहे? असे विचारत न्यायालयाने परिवहन विभागाला दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

Web Title: The seven-month deadline for a 'break test', one month term for other districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार