आगामी निवडणुकांसाठी सेनेची मोर्चेबांधणी सुरू, सेना भवनात बैठक, कोळीवाड्यांच्या जाणून घेतल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:31 AM2018-01-11T06:31:32+5:302018-01-11T06:31:43+5:30

पुढच्या वर्षी कोणाचे सरकार असेल ते आता सांगता येणार नाही, असे वक्तव्य नुकतेच राज्याचे अन्न पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केले होते. त्यामुळे २०१९च्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच शिवसेनेने सुरू केली आहे. त्यानुसार, शिवसेनेचे नेते मुंबईतील कोळीवाड्यांत भेट देत असून, तेथील समस्यांचा आढवा घेत आहेत.

Sena's front line for upcoming elections, meeting in Army Bhawan, Koliwada problems | आगामी निवडणुकांसाठी सेनेची मोर्चेबांधणी सुरू, सेना भवनात बैठक, कोळीवाड्यांच्या जाणून घेतल्या समस्या

आगामी निवडणुकांसाठी सेनेची मोर्चेबांधणी सुरू, सेना भवनात बैठक, कोळीवाड्यांच्या जाणून घेतल्या समस्या

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : पुढच्या वर्षी कोणाचे सरकार असेल ते आता सांगता येणार नाही, असे वक्तव्य नुकतेच राज्याचे अन्न पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केले होते. त्यामुळे २०१९च्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच शिवसेनेने सुरू केली आहे. त्यानुसार, शिवसेनेचे नेते मुंबईतील कोळीवाड्यांत भेट देत असून, तेथील समस्यांचा आढवा घेत आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार बुधवारी दुपारी मुंबईतील समस्त कोळीवाड्यांतील कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना भवन येथे एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न, पालिकेच्या विकास आराड्यात कोळीवाडे अधोरेखित करणे, गावठाणांचा व घरांचा प्रश्न, कोळीवाड्यांची गणना एसआरए समावेशाबाबत कोळीवाड्याचा असलेला विरोध, कोळी बांधवांच्या मासे सुकविण्याच्या खळीच्या व इतर जागांवर झालेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे अशा विविध समस्यांवर कोळी समाजाच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली. या वेळी कोळीवाड्यांतील समस्यांचे निवेदन शिवसेनेच्या नेत्यांना देण्यात आले.
कोळी समाजाच्या समस्यांचे महापालिका, राज्य सरकार व केंद्र सरकार असे वर्गीकरण करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुखांचे आणि कोळी समाजाचे जुने नाते आजही उद्धव ठाकरे यांनी कायम जपले आहे. शिवसेना
ही भूमिपुत्रांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. जर त्यांच्या समस्या सुटल्या नाहीत, तर शिवसेना वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून त्यांना न्याय
देईल, असे आश्वासन शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते, आमदार अनिल परब यांनी दिले. या वेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, सुनील शिंदे, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, विभागप्रमुख अभिजित अडसूळ, उपमहापौर
हेमांगी वरळीकर, नगरसेवक
आशिष चेंबूरकर, संजय अगलदरे, नगरसेविका प्रतिमा खोपडे, संगीता सुतार, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी, वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे, उपाध्यक्ष पराग भावे, उपविभागप्रमुख चिंतामणी निवाते व अनिल भोपी, समाजसेवक संजय सुतार, शाखाप्रमुख सुधाकर अहिरे व शरद प्रभू यांच्यासह मुंबईतील विविध कोळीवाड्यांचे प्रतिनिधी बहुसंख्येने हजर होते.

इतर पक्षांकडूनही तयारीला वेग
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने आघाडी केल्यास दोघांचा फायदा होईल, असे सांगत युतीचे संकेत दिले आहेत, तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी नुकतीच वरळी कोळीवाड्यात सभा घेऊन कोळीवाड्यांचा सीमांकनाचा व इतर प्रश्न मुख्यमंत्री दरबारी सोडविण्याचे आश्वासन दिले होते.
माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचा २०१४मध्ये उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात गजानन कीर्तिकर यांच्याकडून पराभव झाला होता. मात्र, आता कामत यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, त्यांनी गेल्या दीड महिन्यात हा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे, तर गेल्या १५ ते २९ डिसेंबरदरम्यान कामत यांच्या या लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांत त्यांच्या प्रत्येक जनआक्रोश सभांना हजारोंचा प्रतिसाद मिळाला होता.

Web Title: Sena's front line for upcoming elections, meeting in Army Bhawan, Koliwada problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.