सलीम-जावेद ब्लॉकबस्टर जोडी अनेक वर्षांनी एकत्र; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 09:57 PM2023-11-09T21:57:20+5:302023-11-09T21:58:04+5:30

सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

Salim-Javed blockbuster duo together after many years; A story told by Raj Thackeray | सलीम-जावेद ब्लॉकबस्टर जोडी अनेक वर्षांनी एकत्र; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

सलीम-जावेद ब्लॉकबस्टर जोडी अनेक वर्षांनी एकत्र; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

मुंबई दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी दीपोत्सवाचे 11 वे वर्ष असून प्रसिद्ध लेखक जोडी सलीम-जावेद यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उद्घाटन झाले. अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीही यावेळी या दीपोत्सावला हजेरी लावली. 

मनसेच्या दीपोत्सवात जावेद अख्तरांचं धमाकेदार भाषण; जय सियारामचे लावले नारे

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'बारा वर्षांपूर्वी मी घरात बसलो होतो, दिवाळीचे दिवस होते. या शिवाजी पार्क मैदानावर अतिशय काळोख पाहिला. तेव्हा माझ्या मनात दीपोत्सवाची कल्पना आली आणि आज पाहता-पाहता या दीपोत्सवाला अकरा वर्षे होत आहेत. यापूर्वी या दीपोत्सवात सचिन तेंडुलकर, आशा भोसले यांच्यासह अनेक मान्यवर, मराठी कलावंत येऊन गेले आहेत.'

'मी आज सलीम साहेब आणि जावेद साहेबांचे आभार मानेल. मी त्यांना फोन म्हटलं होतं की, असा-असा एक दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे, तुम्ही याल का? यावर दोघांनी होकार दिला. आज अनेक वर्षांनंतर ही सलीम-जावेद ब्लॉकबस्टर जोडी एकत्र आली आहे. मी जावेद साहेबांना फोनवर बोललो, तेव्हा ते म्हणाले की मी येऊन नेमकं काय करायचं आहे? मी म्हणालो की, एक बटन दाबायचं, सगळीकडे रोषणाई होईल. मग ते म्हणाले की, मला काहीच बोलायचं नाही का? मी म्हणालो, तुम्हाला बोलावंच लागेल. तेही म्हणाले की, मी न बोलता जाणार नाही. यावेळी एका फोनवर आल्याबद्दल राज ठाकरेंनी रितेश देशमुखचेही आभार मानले. 

Web Title: Salim-Javed blockbuster duo together after many years; A story told by Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.