बेस्ट कामगारांना पगारवाढ; संप काळातील नऊ दिवसांच्या वेतन कापले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 03:51 AM2019-02-14T03:51:10+5:302019-02-14T03:51:21+5:30

कामगारांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बेस्ट प्रशासनाने जानेवारी महिन्याच्या वेतनात वाढ केली आहे. सरासरी तीन ते चार हजार रुपये अशी वाढ असल्याने कामगारांना ‘बेस्ट’ दिलासा मिळाला आहे.

 Salary Increase to Best Workers; The nine-day wages of the expiry period were cut | बेस्ट कामगारांना पगारवाढ; संप काळातील नऊ दिवसांच्या वेतन कापले

बेस्ट कामगारांना पगारवाढ; संप काळातील नऊ दिवसांच्या वेतन कापले

Next

मुंबई : कामगारांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बेस्ट प्रशासनाने जानेवारी महिन्याच्या वेतनात वाढ केली आहे. सरासरी तीन ते चार हजार रुपये अशी वाढ असल्याने कामगारांना ‘बेस्ट’ दिलासा मिळाला आहे. परंतु, संप काळातील नऊ दिवसांचे वेतन कापून घेण्यात आले आहे. वाढीव वेतन शुक्रवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँकेत जमा होण्याची शक्यता आहे.
वेतनवाढ, वसाहतींची दुरूस्ती अशा विविध मागण्यांसाठी बेस्ट कामगारांनी ७ जानेवारी रोजी संप पुकारला होता़ ९ दिवस चाललेला हा संप ऐतिहासिक ठरला. अखेर उच्च न्यायालयाने कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी लवाद नेमला. त्यानंतर संप मागे घेण्यात आला. जानेवारी महिन्याच्या वेतनात सात हजार रुपये वाढ असल्याचा दावाही कामगार नेते शशांक राव यांनी केला होता.
बेस्ट कर्मचाºयांना बुधवारी जानेवारी महिन्याच्या वेतनाची स्लिप मिळाली आहे. त्यात पगारवाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही वाढ तीन ते चार हजार रुपये आहे़ हे वेतन केवळ २२ दिवसांचे आहे. हा संंप शंभर टक्के यशस्वी झाला होता. त्यामुळे बहुतेक सर्वच कामगारांना नऊ दिवसांचे वेतन कमी मिळाले आहे. सध्या कामगारांना वेतन देण्यासाठी प्रशासन पैशांची जुळवाजुळव करीत असल्याचे समजते.

कामगारांमध्ये संभ्रम
बुधवारी कामगारांना वेतनाची स्लिप मिळाली़ त्यामध्ये मुळ वेतनातून कपात असल्याचे काहींना जाणवले़ याआधी वेतन कपात मुळ वेतनातून न होता एकूण वेतनातून केली जात होती़ आता मुळ वेतनातून कपात झाल्याने कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे़ प्रत्यक्ष वेतन आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे काही कामगारांचे म्हणणे आहे़

Web Title:  Salary Increase to Best Workers; The nine-day wages of the expiry period were cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट