साहित्य संमेलनाला गुजरातकडून २५ लाख, अनुदानामुळे बळकटी येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 02:28 AM2018-02-11T02:28:29+5:302018-02-11T02:28:50+5:30

बडोदा येथे ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता गुजरात शासनाने २५ लाखांचे अनुदान जाहीर केले आहे. येत्या १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान गुजरातमधल्या बडोदे नगरीमध्ये संमेलन होत आहे. संमेलन आयोजनासाठी या अनुदानामुळे आणखी बळकटी येणार आहे, अशी प्रतिक्रिया साहित्य महामंडळाने व्यक्त केली आहे.

Sahitya Sammelan will be strengthened by Rs.25 lakh from the subsidy, subsidy from Gujarat | साहित्य संमेलनाला गुजरातकडून २५ लाख, अनुदानामुळे बळकटी येणार

साहित्य संमेलनाला गुजरातकडून २५ लाख, अनुदानामुळे बळकटी येणार

Next

मुंबई : बडोदा येथे ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता गुजरात शासनाने २५ लाखांचे अनुदान जाहीर केले आहे. येत्या १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान गुजरातमधल्या बडोदे नगरीमध्ये संमेलन होत आहे. संमेलन आयोजनासाठी या अनुदानामुळे आणखी बळकटी येणार आहे, अशी प्रतिक्रिया साहित्य महामंडळाने व्यक्त केली आहे.
संमेलनात ३ दिवस परिसंवाद, चर्चा, विविध भाषिक कविसंमेलन, बोलीभाषा व कविसंमेलन असे कार्यक्रम सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. दररोज संध्याकाळी ७ ते रात्री १० पर्यंत ३ मुख्य कार्यक्रम राहतील, अशी माहिती मराठी वाङ्मय परिषदेचे दिलीप खोपकर यांनी दिली. महाराष्ट्र शासनाचे अनुदान साहित्य संमेलनाला मिळते. मात्र, वाढीव अनुदानामुळे आयोजनाला अधिक प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले. पहिल्या दिवशी ‘मराठी भाषासुंदरी’ या कार्यक्रमात ज्ञानेश्वरांपासून मराठी भाषेचा प्रवास, भाषा कशी बदलत गेली, भाषेतील सौंदर्यस्थळे दर्शविण्याचा प्रयत्न केला जाईल. मराठीत सुमधुर गीत देणारे श्रीनिवास खळे हे बडोद्याचे होते. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी दुसºया दिवशी ‘समग्र खळे दर्शन’ हा कार्यक्रम होईल. तिसºया दिवशी बडोद्यातील मराठी कलाकार ‘बडोदे कलावैभव’ हा कार्यक्रम सादर करतील.

Web Title: Sahitya Sammelan will be strengthened by Rs.25 lakh from the subsidy, subsidy from Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी