'That' s the boyfriend of a policeman | ‘त्या’ पोलीस शिपायाच्या प्रियकराचीही आत्महत्या

मुंबई : प्रेमप्रकरणातून आत्महत्या केलेल्या महिला पोलीस शिपाईच्या मृत्यूनंतर तिच्या प्रियकरानेही थर्टी फर्स्टच्या सकाळी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुकेश बोरगे असे मृत तरुणाचे नाव असून त्याचे वडीलही पोलीस खात्यात आहेत. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी घटनेची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे. दरम्यान, घटनास्थळावर कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.
नायगाव पोलीस वसाहतीत बोरगे कुटूबांसोबत राहयाचा. त्याचे वडील मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. याच वसाहतीत बहिणीसोबत राहत असलेल्या मंजू गायकवाड सोबत त्याचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसबंध होते. नायगाव येथील सशस्त्र विभागात मंजू पोलीस शिपाई म्हणन कार्यरत होती. लग्नास नकार दिला म्हणून २८ नोव्हेंबर रोजी मंजूने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या बहिनीने दिलेल्या तक्रारीवरुन भोईवाडा पोलिसांनी मुकेशवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यामुळे मुकेश मानसिक तणावाखाली होता. थर्टी फर्स्टच्या सकाळी त्याने गळफास घेत आत्महत्या केली.