तोतया पोलिसांना पकडले

By admin | Published: August 18, 2015 01:48 AM2015-08-18T01:48:03+5:302015-08-18T01:48:03+5:30

मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली चौकात पानपट्टीवाल्यास पोलीस असल्याचे सांगून २००० रुपये घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

The robbery caught the police | तोतया पोलिसांना पकडले

तोतया पोलिसांना पकडले

Next

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली चौकात पानपट्टीवाल्यास पोलीस असल्याचे सांगून २००० रुपये घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
माणकोली येथील महेंद्र तिवारी याच्या पानपट्टीवर रविवारी रात्री साडेआठ वाजता शक्ती बादल साठा व सचिन कृष्णा सोनावणे हे दोघे आले. त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे ओळखपत्र दाखवत पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच तिवारी याच्याकडून १५ हजार रुपयांची मागणी करून २ हजार रुपये घेतले. या प्रकरणी शहानिशा केली असता ते तोतया पोलीस असल्याचे समजल्याने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडील दोन हजार रुपये जप्त केले.

Web Title: The robbery caught the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.