निकाल गोंधळ : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 05:15 AM2017-10-07T05:15:20+5:302017-10-07T05:15:44+5:30

मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन पद्धतीने सुरू केलेल्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीमुळे निकाल लागण्यास सप्टेंबर महिना उजाडला. या निकालाच्या गोंधळाचा परिणाम शिक्षणावर झाला आहे.

 Results: The Mumbai University Examination in November | निकाल गोंधळ : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये

निकाल गोंधळ : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये

googlenewsNext

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन पद्धतीने सुरू केलेल्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीमुळे निकाल लागण्यास सप्टेंबर महिना उजाडला. या निकालाच्या गोंधळाचा परिणाम शिक्षणावर झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाने पाचव्या आणि सहाव्या सत्राच्या होण्याºया परीक्षा १ महिना पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बीएससी, टीवाय बीव्होकच्या परीक्षा ९ आॅक्टोबरपासून सुरू होणार होत्या. पण, आता या परीक्षा १३ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धतीत सर्वच यंत्रणा कामाला लागली होती. निकाल रखडल्याने होणारी टीका कमी करण्यासाठी विद्यापीठाने चांगलीच कंबर कसली होती. प्राध्यापकांच्या मदतीने उत्तरपत्रिका तपासणी करण्यात आली. निकालाला झालेल्या दिरंगाईमुळे विद्यापीठाचा कारभार प्रभारी खांद्यावर गेला. कुलगुरुंसह, प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रकांची नवी टीम सध्या विद्यापीठात कार्यरत होती. अजूनही निकालाचा गोंधळ संपलेला नाही. अद्याप ११ हजार निकाल राखीव ठेवले आहेत. तर दीड हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने हे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. निकालाच्या या गोंधळामुळे विद्यापीठाला पुढील सत्राच्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागत आहेत. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

Web Title:  Results: The Mumbai University Examination in November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.