भाजपमध्ये फेरबदल; जिल्हाध्यक्ष बदलणार; पदाधिकाऱ्यांना केले जबाबदाऱ्यांचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 07:26 AM2023-05-26T07:26:21+5:302023-05-26T07:26:41+5:30

येत्या आठ दिवसांत नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जाईल, असे बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.  

Reshuffle in BJP Maharashtra; The district president will change; Allocation of responsibilities to office bearers | भाजपमध्ये फेरबदल; जिल्हाध्यक्ष बदलणार; पदाधिकाऱ्यांना केले जबाबदाऱ्यांचे वाटप

भाजपमध्ये फेरबदल; जिल्हाध्यक्ष बदलणार; पदाधिकाऱ्यांना केले जबाबदाऱ्यांचे वाटप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क  
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे गुरुवारी वाटप केले. येत्या आठ दिवसांत नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जाईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.  

सरचिटणीसांना दिलेली जबाबदारी अशी : विक्रांत पाटील-कोकण विभाग व पालघर जिल्हा, आमदार रणधीर सावरकर-विदर्भ, ॲड. माधवी नाईक-ठाणे विभाग, संजय केनेकर-मराठवाडा, मुरलीधर मोहोळ-पश्चिम महाराष्ट्र, विजय चौधरी-उत्तर महाराष्ट्र. 

उपाध्यक्षांची जबाबदारी-माधव भंडारी-मुख्यालय व अहमदनगर उत्तर, अहमदनगर दक्षिण, चैनसुख संचेती-यवतमाळ, पुसद, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, सुरेश हळवणकर-सांगली शहर, सांगली ग्रामीण, संजय भेगडे- सोलापूर शहर, सोलापूर दक्षिण, साेलापूर उत्तर, राजेश पांडे-पुणे ग्रामीण, पुणे-मावळ, अमर साबळे-पुणे शहर, सातारा, स्मिता वाघ-धुळे शहर व ग्रामीण, जयप्रकाश ठाकूर-ठाणे ग्रामीण, मीरा भाईंदर, ठाणे शहर, संजय भेंडे -भंडारा, वर्धा, अतुल काळसेकर-नवी मुंबई, उत्तर व दक्षिण रायगड, धर्मपाल मेश्राम-चंद्रपूर शहर व ग्रामीण, गोंदिया, गजानन घुगे-नांदेड शहर व ग्रामीण, परभणी शहर व ग्रामीण, विक्रम पावसकर-कोल्हापूर-हातकणंगले, कोल्हापूर पश्चिम, डॉ. अजित गोपचडे-बीड, धाराशिव, हाजी एजाज देशमुख-जालना, राजेंद्र गावित-नाशिक शहर, उत्तर नाशिक, दक्षिण नाशिक. याशिवाय प्रदेश सचिवांनाही जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

Web Title: Reshuffle in BJP Maharashtra; The district president will change; Allocation of responsibilities to office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.