परदेशी पशू-पक्ष्यांची महसूल गुप्तचर संचालनालयाकडून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:21 PM2019-06-18T23:21:27+5:302019-06-18T23:22:02+5:30

अडीचशेहून अधिक प्रजाती; मुंबई व नवी मुंबईतील मार्केटवर कारवाई

Rescue from the Directorate of Foreign and Animal Fisheries Revenue | परदेशी पशू-पक्ष्यांची महसूल गुप्तचर संचालनालयाकडून सुटका

परदेशी पशू-पक्ष्यांची महसूल गुप्तचर संचालनालयाकडून सुटका

Next

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) कडून मुंबई व नवी मुंबईमध्ये तस्करी करण्यासाठी आणलेल्या परदेशी पशू-पक्ष्यांची सुटका करण्यात आली आहे. डीआरआयला तस्करीची गुप्त माहिती मिळाली होती. कारवाईतून विविध प्रजातींच्या २५० हून अधिक पशू-पक्ष्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. परदेशी पशू- पक्ष्यांची जबाबदारी ठाणे वनविभागाने घेतली आहे.

दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, कुर्ला, सांताक्रुझ, गोवंडी आणि नवी मुंबईतल्या काही ठिकाणी छापे मारून कारवाई करण्यात आली. यात लव्ह बर्डस्, आफ्रिकन व बर्मीज पोपट, बदक इत्यादी पक्ष्यांचा समावेश आहे. प्राण्यांमध्ये आकर्षक दिसणारी मांजरे व माकडे ताब्यात घेण्यात आली आहेत.

दुर्मीळ प्रजातीचा व्हाईट ब्लॅक रूफेड लेमूर देखील आढळून आला. परदेशी पक्षी व प्राण्यांच्या तस्करीवरती कोणत्याही प्रकाराची बंधने नसल्यामुळे अशा गुन्ह्यांना वाव मिळतो. ठाणे वनविभागाचे उप वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी यासंदर्भात सांगितले की,
आर्थिक व्यवहारातून परदेशातील पशु-पक्षी अवैधरित्या भारतामध्ये आणण्यात आले होते. भारतीय वन्यजीव कायद्यामध्ये परदेशातून तस्करीसाठी आणलेले पशू-पक्षी बसत नाही. कारण त्या पक्ष्यांचे व प्राण्यांची नावे आपल्या कायद्यात नाहीत, त्यामुळे गुन्हा दाखल करू शकत नाही. सीमा शुल्क कायदा आणि व्हॉयोलेशन आॅफ फॉरन ट्रेड पॉलिसी या दोन कायद्यानुसार डीआरआयने गुन्हे दाखल केले आहेत. सर्व पक्षी व प्राणी ठाणे वनविभागाने ताब्यात घेतले आहेत.

परदेशी पशू-पक्षी ठाणे वनविभागाच्या ताब्यात
डीआरआयने कारवाई केलेले पशू-पक्षी ठाणे वनविभागाने ताब्यात घेतले आहेत. ठाणे एसपीसीए व रॉ संस्थेचे स्वयंसेवक त्या प्राण्यांची देखभाल आणि काळजी घेत आहेत. डीआरआयकडे जास्त संख्येच्या पशू-पक्ष्यांना ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्यांना तात्पुरते ठाणे वनविभागाकडे सोपविण्यात आले आहे.
- पवन शर्मा, संस्थापक, रॉ संस्था.

Web Title: Rescue from the Directorate of Foreign and Animal Fisheries Revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.