दुष्काळग्रस्तांच्या सर्व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:50 AM2019-06-25T04:50:28+5:302019-06-25T04:50:48+5:30

राज्याच्या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करीत आहे.

Reimbursement of all the drought-relief fees | दुष्काळग्रस्तांच्या सर्व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करणार

दुष्काळग्रस्तांच्या सर्व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करणार

Next

मुंबई : राज्याच्या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करीत आहे. यापुढे प्रात्यक्षिक परीक्षांच्या शुल्काची प्रतिपूतीर्ही सरकार करणार असून १५ दिवसांत ती केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
विधानसभेत राज्यातील दुष्काळी भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफ करणेबाबत भीमराव धोंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. शुल्क प्रतिपूर्तीसाठी सोलापूर जिल्ह्यातील पात्र असलेल्या ९७२ माध्यमिक शाळांपैकी ५१८ शाळांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील ७७ व मंगळवेढा तालुक्यातील ३४ शाळांचा समावेश आहे. १० वीच्या २४ हजार १३८
तर १२ वीच्या १२ हजार ६१० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त असून, शालेय शिक्षण ८.५० कोटींची तर, समाज कल्याण विभाग ४८ लाखांची प्रतीपूर्ती पुढील १५ दिवसांत करून विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यात येईल. दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेल्या तालुके व महसुली मंडळातील प्रस्ताव आले नाहीत अशा शाळांकडून ते मागविण्यात येतील असेही ते म्हणाले.

आॅनलाइन पद्धत राबविणार

या पारंपारिक पद्धतीने शुल्क विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत असल्याने, भविष्यात आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येईल.
जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात शैक्षणिक शुल्क जमा करण्यात येईल असेही शेलार यांनी सांगितले. गणपतराव देशमुख, शशिकांत शिंदे, सुरेश हाळवणकर यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

Web Title: Reimbursement of all the drought-relief fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.