‘समुद्रातील प्रकल्पाचा पुनर्विचार करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:19 AM2018-06-17T01:19:54+5:302018-06-17T01:19:54+5:30

वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. विकासात्मक प्रकल्प राबविण्यासाठी समुद्रात भराव टाकण्यात येणार आहे.

'Reconsider the Project in the Sea' | ‘समुद्रातील प्रकल्पाचा पुनर्विचार करा’

‘समुद्रातील प्रकल्पाचा पुनर्विचार करा’

Next

मुंबई : वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. विकासात्मक प्रकल्प राबविण्यासाठी समुद्रात भराव टाकण्यात येणार आहे. परिणामी, समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या नागरी वस्त्या, इमारती यांना समुद्री लाटेचा आणि इमारतीमध्ये पाणी घुसण्याची भीती वॉचडॉग फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबईत कोस्टल रोड, कफ परेड यासारखे प्रकल्प आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात भराव टाकून उभारल्याने, समुद्री जिवांना आणि समुद्र किनाºयांवर राहणाºया मनुष्य वस्तींना धोका आहे. यामुळे समुद्रात भराव टाकून विकासात्मक प्रकल्प उभारणे कितपत योग्य आहे, याचा विचार सरकारने करावा, असे वॉचडॉग फाउंडेशचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांचे म्हणणे आहे.

Web Title: 'Reconsider the Project in the Sea'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.