बंधुभेट! जयदेव ठाकरेंची भेट घेऊन राज ठाकरे यांनी दिले मुलाच्या लग्नाचे निमंत्रण 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 11:25 AM2019-01-06T11:25:30+5:302019-01-06T11:26:40+5:30

मुलाच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबातील आपल्या अजून एका भावाची भेट घेतली, मात्र या भेटीची फारशी चर्चा झाली नाही.

Raj Thackeray's meet Jayadev Thackeray | बंधुभेट! जयदेव ठाकरेंची भेट घेऊन राज ठाकरे यांनी दिले मुलाच्या लग्नाचे निमंत्रण 

बंधुभेट! जयदेव ठाकरेंची भेट घेऊन राज ठाकरे यांनी दिले मुलाच्या लग्नाचे निमंत्रण 

googlenewsNext
ठळक मुद्देमुलगा अमित ठाकरे याच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे ज्येष्ठ बंधू जयदेव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना विवाहाचे निमंत्रण दिलेराज यांच्या भेटीने जयदेव ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला

मुंबई  - मुलगा अमित ठाकरे याच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. याचदरम्यान, राज ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबातील आपल्या अजून एका भावाची भेट घेतली, मात्र या भेटीची फारशी चर्चा झाली नाही. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे ज्येष्ठ बंधू जयदेव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना विवाहाचे निमंत्रण दिले.

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा विवाह 27 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे सध्या राज ठाकरेंच्या कुटुंबात लगीनघाई सुरू आहे. दरम्यान, स्वत: राज ठाकरे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांना विवाहाचे निमंत्रण देत आहेत. लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे काल मातोश्रीवर गेले होते. तेथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन राज ठाकरेंनी त्यांनी विवाहाचे निमंत्रण दिले. 

त्यानंतर ज्येष्ठ बंधू जयदेव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनाही राज ठाकरे यांनी निमंत्रण दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या सर्वाधिक आठवणी जयदेव आणि राज यांच्याकडेच आहेत. त्यामुळे राज यांच्या भेटीने जयदेव ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. 

Web Title: Raj Thackeray's meet Jayadev Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.