मुंबई शहरासह उपनगराला पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 02:04 AM2018-08-02T02:04:50+5:302018-08-02T02:05:05+5:30

पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना उकाडा असह्य झाला आहे. मात्र, मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. शहर आणि उपनगरात २ आणि ३ आॅगस्ट रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

 Rainfall Warning to Suburban with Mumbai City | मुंबई शहरासह उपनगराला पावसाचा इशारा

मुंबई शहरासह उपनगराला पावसाचा इशारा

Next

मुंबई : पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना उकाडा असह्य झाला आहे. मात्र, मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. शहर आणि उपनगरात २ आणि ३ आॅगस्ट रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबईसह राज्यातही पाऊस पडेल, असा अंदाज आहे. ३ ते ५ आॅगस्टदरम्यान कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे भाकीत भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले. २ ते ४ आॅगस्टदरम्यान कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ५ आॅगस्टला कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

Web Title:  Rainfall Warning to Suburban with Mumbai City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.