डोकं फिरलंया....सफाई कामगारांच्या परीक्षेत विचारले IAS चे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 01:56 PM2018-03-15T13:56:23+5:302018-03-15T14:43:50+5:30

परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी आपली अक्कल गहाण ठेवली होती की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. 

Questioning the safety of the employees in the cleaning | डोकं फिरलंया....सफाई कामगारांच्या परीक्षेत विचारले IAS चे प्रश्न

डोकं फिरलंया....सफाई कामगारांच्या परीक्षेत विचारले IAS चे प्रश्न

Next

मुंबई - दहावी पास अशी शिक्षणाची अट असलेल्या सफाई कामगारांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत विचारलेले अत्यंत कठीण प्रश्न उच्च शिक्षितांनाही सोडवता येणार नाहीत असे होते. या प्रकरणी भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. गिरकरांनी विधानपरिषदेत यासंबंधी प्रश्न विचारला होता. मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार भरती परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापतींनी विधानपरिषदेत निर्देश दिले आहेत. 

मुंबई महापालिकेने 1388 सफाई कामगारांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी सफाई कामगार पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी आपली अक्कल गहाण ठेवली होती की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. 

सफाई कामगार भरतीसाठी विचारलेले भन्नाट प्रश्न

  • भारताचे 44 वे सरन्यायाधीश कोण?
  • 88 नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते?
  • फुलांमध्ये अथवा वनस्पतीमध्ये दुसऱ्या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील परागकणांच्या होणाऱ्या परागसिंचनास काय म्हणतात?
  • गायनेशियम म्हणजे काय?
  • लोणच्यामध्ये उपयोगात येणाऱ्या विनेगर मध्ये काय असते?
  • सिरिकल्चर कशाशी संबंधित आहे ?
  • निशा आणि मिशा यांनी अनुक्रमे 2000 आणि 2750 गुंतवणूक करुन एक व्यवसाय चालू केला. तथापि, मिशा हिला काही महिन्यानंतर आपला पैसा काढावा लागला. त्यांच्या परिणामी 12 महिन्यांच्या शेवटचा नफा निशा आणि मिशा यांमध्ये 12:11 या गुणोत्तरांने वाटला गेला. निशा हिने आपला पैसा गुंतवून ठेवलेल्या महिन्यांची संख्या किती.
  • 72 कि.मी. ताशी या गतीने प्रवास करणारी एक आगगाडी 6 सेकंदात 1 पोल ओलांडते. ही आगगाडी 480 मीटर फलाट पार करायला किती वेळ लावेल?

Web Title: Questioning the safety of the employees in the cleaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.