मालमत्ता करामध्ये १४ टक्के वाढ

By admin | Published: March 18, 2015 01:53 AM2015-03-18T01:53:29+5:302015-03-18T01:53:29+5:30

जागेच्या कार्पेट क्षेत्रफळानुसार मालमत्ता कर आकारण्याची तयारी पालिका प्रशासनाने दाखविल्यामुळे मुंबईकरांचे ५५० कोटी वाचतील, असा दावा करीत भाजपाने याचे श्रेय लाटण्यास सुरुवात केली आहे़

Property tax increased 14 percent | मालमत्ता करामध्ये १४ टक्के वाढ

मालमत्ता करामध्ये १४ टक्के वाढ

Next

मुंबई : जागेच्या कार्पेट क्षेत्रफळानुसार मालमत्ता कर आकारण्याची तयारी पालिका प्रशासनाने दाखविल्यामुळे मुंबईकरांचे ५५० कोटी वाचतील, असा दावा करीत भाजपाने याचे श्रेय लाटण्यास सुरुवात केली आहे़ मात्र मालमत्ता कराच्या सुधारित दरानुसार करदात्यांना आता १ एप्रिलपासून १४ टक्के जादा कर भरावा लागणार असल्याचे उजेडात आले आहे़
आतापर्यंत फ्लॅटच्या बिल्टअप क्षेत्रफळानुसार मालमत्ता कर आकारण्यात येत होता़ यामध्ये बदल करीत मालमत्ता कर कार्पेट एरियानुसार आकारण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले़ मात्र हा बदल करताना मालमत्ता करामधील तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने २० टक्के करवाढ सुचविली होती़ गेल्या दीड वर्षांपासून हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर रेंगाळला होता़
अखेर न्यायालयाच्या आदेशामुळे बांधील प्रशासनाने माघार घेत कार्पेट एरियानुसार कर आकारण्याचा निर्णय घेतला़ २०१५-१६ या वर्षात २० टक्के वाढ रद्द केली आहे़ तथापि, सुधारित करप्रणालीनुसार मालमत्ता करामध्ये २७ टक्के वाढ सुचविण्यात आली होती़ नुकतेच रेडीरेकनरचे दर प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकरांवर कराचा बोजा पडणार आहेच. ही वाढ २७ टक्के नसली तरी १४ टक्के वाढीव मालमत्ता कर मुंबईकरांना सोसावाचलागेल..
कोट्यवधींचा परतावा
२०१० ते २०१५ या काळात पालिकेने जागेच्या बिल्टअप एरियानुसार मालमत्ता कर वसूल केला आहे़ हा कर कार्पेट एरियापेक्षा अर्थातच अधिक आहे़ त्यामुळे नवीन बदल केल्यानंतर या चार वर्षांमध्ये वसूल केलेली सुमारे १२०० कोटींची रक्कम करदात्यांना परत मिळेल,असे भाजपाचे गटनेते मनोज कोटक म्हणाले़ (प्रतिनिधी)

सेना-भाजपात नवीन वाद
निवडणुका स्वतंत्र लढण्याची भाजपाची तयारी दिसून येत आहे़ म्हणूनच प्रत्येक श्रेय लाटण्याची धडपड भाजपातून सुरू आहे़ मालमत्ता कराचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे वर्षभर रखडला होता़ हा प्रस्ताव गेल्या जूनमध्येच मंजूर झाला असता, तर मुंबईकरांना सातशे कोटींचा भुर्दंड पडला असता़ या प्रस्तावास विरोध करून भाजपाने मुंबईकरांना दिलासा दिल्याचा दावा भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला आहे़ मात्र शिवसेनेनेही या श्रेयावर दावा केल्यामुळे या मुद्द्यावरून नवीन वादाला तोंड फुटण्याचे चिन्ह आहे़

Web Title: Property tax increased 14 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.