शाळांच्या आवारात पुस्तक विक्रीला बंदी

By admin | Published: April 28, 2017 12:54 AM2017-04-28T00:54:14+5:302017-04-28T00:54:14+5:30

खासगी शाळांच्या आवारात खुलेआम पुस्तकांची आणि अन्य शालेय साहित्याची विक्री केली जाते. नियमाप्रमाणे शाळांना आवारात विक्री करण्याचा अधिकार नाही.

Prohibition of book sale in school premises | शाळांच्या आवारात पुस्तक विक्रीला बंदी

शाळांच्या आवारात पुस्तक विक्रीला बंदी

Next

मुंबई : खासगी शाळांच्या आवारात खुलेआम पुस्तकांची आणि अन्य शालेय साहित्याची विक्री केली जाते. नियमाप्रमाणे शाळांना आवारात विक्री करण्याचा अधिकार नाही. याला आळा घालण्यासाठी महापालिका शिक्षण विभागाने शाळांना अशा प्रकारची विक्री थांबवण्याचे आदेश दिले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
शाळेच्या आवारात बेकायदेशीर होत असलेल्या पुस्तकांच्या विक्री संदर्भात बॉम्बे बुक सेलर्स अँड पब्लिशर्स असोसिएशने तक्रार दाखल करत, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे होत असलेली पुस्तक विक्री थांबवावी, अशी मागणी केली होती. अनेकदा शाळा दुसऱ्यांकडून या साहित्याची विक्री करतात, पण हेदेखील बंद व्हावे, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाने असोसिएशनने केलेल्या तक्रारीची दखल घेत, शाळांसाठी आदेश काढले आहेत. त्यानुसार, महापालिका क्षेत्रातील अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या पुस्तक आणि अन्य वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
काही शाळा आवारांमध्ये विक्री करत नाहीत, पण पालकांना विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्यास सांगितले जाते. त्यामुळे पालकांची लूट होते, याकडेही असोसिएशनने लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Prohibition of book sale in school premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.