जोगेश्वरीतील मुलांच्या वसतिगृहाची समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 05:07 AM2018-09-17T05:07:43+5:302018-09-17T05:08:11+5:30

जोगेश्वरी पूर्वेकडील महात्मा जोतिबा फुले मुलांच्या वसतिगृहाच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने वस्तुस्थिती मांडताच, प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

Problems with the hostel of Jogeshwari children | जोगेश्वरीतील मुलांच्या वसतिगृहाची समस्या सुटणार

जोगेश्वरीतील मुलांच्या वसतिगृहाची समस्या सुटणार

Next

मुंबई : जोगेश्वरी पूर्वेकडील महात्मा जोतिबा फुले मुलांच्या वसतिगृहाच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने वस्तुस्थिती मांडताच, प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासन आता येथील वसतिगृहाच्या समस्या सोडवित असून, वसतिगृहाच्या भोजनालयातील तुटलेल्या आसनांची दुरुस्ती करण्यात आली, तसेच इतरही कामे त्वरित केली जाणार असल्याची ग्वाही संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
वसतिगृहात भोजनगृहातील बैठक व्यवस्था दुरुस्त करण्यात आली, तसेच सफाईसाठी वसतिगृहात खासगी कंपनीचे सफाई कामगार नेमण्यात आले असून, त्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने वेळेत साफसफाई केली जात नाही.
वसतिगृहात ढेकणांचा सुळसुळाट आणि उंदरांच्या वाढत्या संख्येमुळे सोमवारी वसतिगृहात पेस्ट कंट्रोल करण्याचे आश्वासन वसतिगृहातील अधिकाऱ्यांनी दिले आहे, तसेच आहारातील पदार्थ बदलले जातील, असे सांगण्यात आले आहे, अशी माहिती विद्यार्थी कृती समितीचा प्रमुख नामदेव गुलदगड यांनी दिली.
याबाबत महात्मा जोतिबा फुले मुलांच्या वसतिगृहाचे प्रभारी गृहपाल म्हणाले की, जेवढी कामे शक्य आहेत, तेवढी हळूहळू करण्यात येत आहेत. बाकीच्या समस्यांही लवकरच सोडविण्यात येतील, तसेच वसतिगृहाकडून सावर्जनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्तीसाठी सततचा पाठपुरावा सुरू आहे.

अधिकाºयांच्या सूचनेकडे कानाडोळा
वसतिगृहात १४० विद्यार्थी राहतात, परंतु विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेला हातभार मिळत नसल्याची खंत वसतिगृहातील अधिकाºयांनी व्यक्त केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी राहात असून, जेवणाची भांडी कचºयात टाकली जातात.
त्यामुळे कित्येक जेवणाची भांडी गायबही होतात. जेवण झाल्यावर जेवणाची भांडी मेसमध्ये नेऊन ठेवा, असे वसतिगृहातील अधिकाºयांकडून वारंवार विद्यार्थ्यांना सांगण्यात येते, पण विद्यार्थी याकडे कानाडोळा करतात.

Web Title: Problems with the hostel of Jogeshwari children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.