Preliminary Results of 30th Marathi Professional Drama Competition | 30 व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरीचा निकाल जाहिर
30 व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरीचा निकाल जाहिर

मुंबई   - 30 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आज प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केला आहे. या स्पर्धेत एकूण 22 नाट्यसंस्थांनी प्रयोग सादर केले. त्यामध्ये अंतिम फेरीसाठी खालीलप्रमाणे दहा नाटकांची निवड करण्यात आलेली आहे-

अनन्या(सुधीर भट थिएटर्स), संगीत देवबाभळी (भद्रकाली प्रॉडक्शन्स), वेलकम जिंदगी (त्रिकूट, मुंबई), माकड (श्री स्वामी समर्थ आर्टस्), उलट सुलट (सुयोग), अशीही श्यामची आई (सुधीर भट थिएटर्स), युगांत (जिगिषा आणि अष्टविनायक), समाजस्वास्थ (अतूल पेठे प्रॉडक्शन्स), फायनल डिसीजन (जाई वल्लरी फॉर यू प्रॉडक्शन), ढाई अक्षर प्रेम के (रसिका) या दहा नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून उपेंद्र दाते,  संजय डहाळे आणि महेंद्र तेरेदेसाई यांनी काम पाहिले. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सर्व नाट्यसंस्थांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले. 


Web Title: Preliminary Results of 30th Marathi Professional Drama Competition
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.