प्रवीण परदेशी नवे मुंबई महापालिका आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 07:13 PM2019-05-10T19:13:44+5:302019-05-10T19:29:17+5:30

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राहिलेल्या प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Praveen Pardesi new Municipal Commissioner | प्रवीण परदेशी नवे मुंबई महापालिका आयुक्त

प्रवीण परदेशी नवे मुंबई महापालिका आयुक्त

Next

मुंबई- मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राहिलेल्या प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मावळते मुख्य सचिव यूपीएस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून (करार पद्धतीने) प्रथम एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने हा शासन आदेश काढला आहे.

2014मध्ये मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपले प्रधान सचिव म्हणून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती केली होती. ते मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. बेधडक निर्णय घेणारे, दूरदर्शी आणि अभ्यासू प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रवीण परदेशी ओळखले जातात. लातूर भूकंपादरम्यान त्यांनी केलेल्या कामाचं राज्यातच नव्हे तर देशात भरभरून कौतुक झालं होतं.

या शाबासकीनं त्यांना नवं बळ मिळालं होतं. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला आहे, प्रत्येक जबाबदारी अगदी समर्थपणे पार पाडली आहे. परदेशी यांचा वनांचा दांडगा अभ्यास असून जंगलं जगली पाहिजेत, प्राण्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालंच पाहिजे, याबाबत ते आग्रही आहेत. 

Web Title: Praveen Pardesi new Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.