मारेकऱ्याचे नाव सांगून सोडले प्राण, आरोपी मित्र अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:35 AM2019-04-04T01:35:09+5:302019-04-04T01:35:35+5:30

विक्रोळीतील घटना : आरोपी मित्र अटकेत

Pran, the accused friend detained, gave up the name of the deceased | मारेकऱ्याचे नाव सांगून सोडले प्राण, आरोपी मित्र अटकेत

मारेकऱ्याचे नाव सांगून सोडले प्राण, आरोपी मित्र अटकेत

googlenewsNext

मुंबई : चोरीचा आरोप केल्याच्या रागातून नोकरीवरून घरी परतत असताना, मित्रानेच गुरफान खान या तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करत, तो रस्त्याने ‘वाचवा वाचवा’ म्हणत पळत होता. पुढे, काही अंतरावर मेट्रोच्या कर्मचाऱ्याला पाहून मदत मागितली. त्याच्या मोबाइलवरून मालकिणीला फोन करून, मारेकरी मित्राने वार केल्याचे सांगत, त्याला अटक करा, असे सांगून प्राण सोडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली.

या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी सलमान खान याला अटक केली आहे. सलमान आणि गुरफान जोगेश्वरी परिसरात गारमेंटमध्ये नोकरीला होते. दोघेही गोरेगाव परिसरात राहतात. तेथे काही दिवसांपूर्वी चोरी झाली. ही चोरी सलमानने केली, असा आरोप गुरफानने केला.
त्यामुळे दोघांमध्ये खटके उडायला लागले. सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दोघेही कामावरून घरी परतत होते. त्याच दरम्यान विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड परिसरात येताच, सलमानने चाकूने गुरफानच्या गळ्यावर वार केले. त्याने, त्याच अवस्थेत रस्त्यावर वाचवा वाचवा म्हणत धाव घेतली. सलमानही मागे येत होता.

पुढे, काही अंतरावर गेल्यानंतर एक मेट्रो कर्माचारी गुरफानला दिसला. त्याने, घडलेला प्रकार त्यांना सांगून मदत मागितली. त्याच्याकडील मोबाइलवर मालकिणीला फोन केला. त्यांना सलमानने हल्ला केल्याचे सांगून त्याला अटक करा. घरच्यांनाही सांगा मी इथे आहे. असे सांगत तो बेशुद्ध झाला. घटनेची माहिती मिळताच, विक्रोळी पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी गुरफानला रुग्णालयात नेले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मालकीण तसेच मेट्रो कर्मचाºयाकडून वरील घटनाक्रम उघडकीस येताच, विक्रोळी पोलिसांनी सलमानला अटक केली आहे. त्याच्याविरोधात याचा खटला चालेल़ त्यासाठी पोलीस आरोपपत्र दाखल करतील़ त्याने आरोप फेटाळले तर या प्रकरणी रीतसर सुनावणी होईल़
 

Web Title: Pran, the accused friend detained, gave up the name of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.