ठळक मुद्दे५ तासांचा ब्लॉकमध्यरात्री डाऊन सेवांचा वेग मंदावणार

आज आणि उद्या मध्यरात्री ईस्‍टर्न एक्‍सप्रेस महामार्गाच्‍या कोपरी उड्डाण पुला वर ५ तास ट्राफीक आणि पावर ब्‍लॉक घेण्यात येणार आहे. याकाळात रेल्वे प्रशासनाकडून पुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. ईस्‍टर्न एक्‍सप्रेस महामार्गाच्‍या कोपरी उड्डाण पुला वर स्‍लॅब च्‍या रिंपेरिंग कार्या साठी मध्‍य रेल्‍वे ने दिनांक १३/१४.१०.२०१७ (शुक्रवार/शनिवार मध्‍य रात्री) आणि‍ १४-१५.१०.२०१७ (शनिवार/रविवार मध्‍य रात्री) ला रात्री ब्‍लॉक घेण्‍याचा निर्णय घेतला आहे. उपनगरीय गाड्यांच्‍या मार्गात बद्ल रात्री २३.२९ वाजता आणि ०४.२९वाजता ठाणे येथून रात्री २३.२९आणि सकाळी ०४.२९ वाजता सुटणारी अप स्‍लो मार्गाची सेवा अप जलद मार्गावर चालविण्‍यात येईल. या काळात लोकलची सेवा नाहुर आणि काजुरमार्ग स्‍थानंकावर उपलब्‍ध राहणार नाही. डाऊन लोकल सेवांचे अशत: रद्दीकरण १३/१४.१०.२०१७ (शुक्रवार/शनिवार मध्‍य रात्री) आणि‍ १५.१६.१०.२०१७ (शनिवार/रविवार मध्‍य रात्री) रोजी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.४९आणि २३.४९ वाजता सूटणारी ठाणे लोकलची सेवा फक्‍त कुर्ला स्‍थानंका पर्यंत चालविण्‍यात येईल.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.