कांजुरमार्ग स्टेशनवर पावडर रूम, वॉश बेसिनसह मेकअपचीही सोय

By सचिन लुंगसे | Published: March 21, 2024 05:19 PM2024-03-21T17:19:58+5:302024-03-21T17:20:38+5:30

कांजूरमार्ग स्थानकावर महिला प्रवाशांना स्वच्छता प्रदान करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पावडर रुममध्ये शौचालयाची सुविधा, वॉश बेसिन आणि आरसा असलेली खोली आहे.

Powder room, makeup facility with wash basin at Kanjurmarg station as well | कांजुरमार्ग स्टेशनवर पावडर रूम, वॉश बेसिनसह मेकअपचीही सोय

कांजुरमार्ग स्टेशनवर पावडर रूम, वॉश बेसिनसह मेकअपचीही सोय

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणा-या महिला प्रवाशांना शौचालयासह उर्वरित सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून पावडर रुम सुरु करण्यात आली असून, ठाणे व मुलुंडनंतर आता कांजुरमार्ग रेल्वे स्थानकांवरही पावडर रुमचा शुभारंभ करण्यात आला आहे. शिवाय एलटीटी, घाटकोपर आणि चेंबूर रेल्वे स्थानकांवरही पावडर रुम सुरु केली जाणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

कांजूरमार्ग स्थानकावर महिला प्रवाशांना स्वच्छता प्रदान करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पावडर रुममध्ये शौचालयाची सुविधा, वॉश बेसिन आणि आरसा असलेली खोली आहे. जिथे महिला शौचालयाचा वापर करू शकतात, हात धुवू शकतात आणि काही मेकअप देखील करू शकतात. हे सार्वजनिक शौचालयांपेक्षा वेगळे आहे.

पावडर रूम ही मुळात रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप, बस स्थानक, मॉल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठीची खोली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने लेडीज पावडर रूम सुरू करण्याची योजना आखली आहे. या उपक्रमामुळे ५ वर्षांसाठी दरवर्षी ३९.४८ लाख महसूल मिळेल.

- टॉयलेट वापराचे शुल्क प्रति व्यक्ती, प्रत्येक वेळेस १० रुपये असेल.
- वूमन पावडर रूम ओळखपत्र असलेले वैध कर्मचारी असतील.
- पावडर रूममध्ये कॅशलेस पेमेंट करता येईल.

Web Title: Powder room, makeup facility with wash basin at Kanjurmarg station as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.