पोस्ट कर्मचाऱ्यांची आज निदर्शने, २० जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:21 AM2018-07-03T01:21:21+5:302018-07-03T01:21:40+5:30

पोस्टमन व मल्टी टास्क स्टाफ (एम.टी.एस.) या प्रवर्गातील रिक्त पदे त्वरित भरावीत, या मागणीसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियन व नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉइज या संघटनांतर्फे मंगळवारी निदर्शने करण्यात येणार आहेत.

Post workers' protest today, warning of strikes from 20th of July | पोस्ट कर्मचाऱ्यांची आज निदर्शने, २० जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा

पोस्ट कर्मचाऱ्यांची आज निदर्शने, २० जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा

googlenewsNext

मुंबई : पोस्टमन व मल्टी टास्क स्टाफ (एम.टी.एस.) या प्रवर्गातील रिक्त पदे त्वरित भरावीत, या मागणीसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियन व नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉइज या संघटनांतर्फे मंगळवारी निदर्शने करण्यात येणार आहेत. प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास, २० जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
अनुकंपा तत्त्वावरील सर्व रिक्त जागा, ग्रामीण डाक सेवकांच्या सर्व रिक्त जागा भराव्यात, नवीन भरती होईपर्यंत पोस्टमन व एमटीएसच्या रिक्त पदावर रोजंदारी पद्धतीने कर्मचारी नियुक्त करावेत, रोजंदारी कर्मचाºयांच्या रोजंदारी दरात वाढ करावी, त्यांना पार्ट टाइम कॅज्युअल लेबरचा दर्जा द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी निदर्शने करणार असल्याची माहिती एस. जी. काळोखे यांनी दिली. याबाबत महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल एच. सी. अग्रवाल यांना २१ जून रोजी नोटीस देण्यात आली आहे.

Web Title: Post workers' protest today, warning of strikes from 20th of July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई