पोलीस पाटील स्वत:च भरणार स्वत:ची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 05:25 AM2018-02-08T05:25:27+5:302018-02-08T05:25:54+5:30

राज्यातील हजारो पोलीस पाटलांना दर महिन्याला तीन हजार रुपये इतके मानधन दिले जाते खरे; पण अनेकदा ते गावांत उपस्थितच राहत नाहीत तसेच त्यांच्या मानधन वाटपात अनियमितता होत असल्याची बाब समोर आली आहे.

Police Patil himself fills his own self | पोलीस पाटील स्वत:च भरणार स्वत:ची हजेरी

पोलीस पाटील स्वत:च भरणार स्वत:ची हजेरी

Next

मुंबई : राज्यातील हजारो पोलीस पाटलांना दर महिन्याला तीन हजार रुपये इतके मानधन दिले जाते खरे; पण अनेकदा ते गावांत उपस्थितच राहत नाहीत तसेच त्यांच्या मानधन वाटपात अनियमितता होत असल्याची बाब समोर आली आहे.
महालेखाकार कार्यालयाने ठाणे जिल्ह्यातील पोलीस पाटलांबाबत माहिती घेतली असता हे वास्तव समोर आले. पोलीस पाटलांचे मानधन शासनाने २०१२ पासून ८०० रुपयांवरून मासिक ३ हजार रुपये करण्यात आले आहे.
पोलीस पाटील बरेचदा गावातच नसतात असे आढळून आल्यानंतर आता गृह विभागाने एक परिपत्रक काढून त्यांना स्वत:च्या हजेरीचे पुस्तक स्वत:च तयार करायला आणि त्यात रोजच्या उपस्थितीची नोंद करण्यास सांगितले आहे. या शिवाय त्यांना एक वेगळी नोंदवही तयार करून त्यावर महसूल आणि पोलीस अधिकाºयांच्या भेटींची नोंद ठेवावी लागणार आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत एखादा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस पाटील यांची उपस्थिती तेथे अत्यावश्यक असते. त्यामुळे एखाद्या अप्रिय घटनेच्या वेळी पोलीस पाटील हे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उपस्थित होते की नाही याची खातरजमा नोंदवहीवरून करता येणार आहे.

Web Title: Police Patil himself fills his own self

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.