Police bribery mauled police woman | पोलीस हवालदाराकडून पोलीस महिलेचा विनयभंग
पोलीस हवालदाराकडून पोलीस महिलेचा विनयभंग

मुंबई - रोडरोमियोप्रमाणे पाठलाग करीत भररस्त्यात हात पकडून पोलीस हवालादाराने महिला पोलीस शिपायाचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मलबार हिल येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अफसल मुलानीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला पोलीस मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. तिने केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ती त्वचा विकारासंबंधी डॉक्टरच्या शोधात होती. त्याच दरम्यान तिच्या सहकाºयाने मुलानीसोबत तिची ओळख करुन दिली. मुलानीच्या ओळखीने तिने एका डॉक्टरकडे उपचार सुरू केले. त्यानंतर मुलानी तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याने तिला चहासाठी आॅफर केली. त्यानंतर एकदा शर्ट खरेदी करण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली. त्यानंतर त्याचे फोन सुरु झाले. तो रोज मेसेज करु लागला. तिने याबाबत त्याला सुनावूनही तो गप्प राहात नव्हता.
अशातच नोव्हेंबरमध्ये त्याने भररस्त्यात तिचा हात पकडला आणि ^^‘आय लव्ह यू’ म्हटले. त्याला नकार देत ती तेथून निघून गेली. महिन्याभराने त्याने तिची माफी मागितली आणि पुन्हा असे करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचे शुभसकाळचे संदेश येणे सुरू झाले. याच दरम्यान त्याने तिला कॉल करुन एका बीट चौकीच्या रुममध्ये बोलावले. त्यामुळे तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. मुलानीच्या संदेशांकडेही दुर्लक्ष केले. याच रागात तो आणखी त्रास देऊ लागला. तसेच पोलीस दलात बदनामी करण्याची धमकीही देऊ लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


Web Title: Police bribery mauled police woman
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.