जिजाऊंचे चित्र रेखाटणाऱ्या चित्रकाराला मिळणार न्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:13 AM2018-04-25T01:13:35+5:302018-04-25T01:13:35+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाºया मांसाहेब जिजाऊ यांचे चित्र जगभरात कुठेच उपलब्ध नव्हते. ही कमतरता चित्रकार बंडू मोरे यांनी भरून काढली.

Picture of Jijau painting will get justice! | जिजाऊंचे चित्र रेखाटणाऱ्या चित्रकाराला मिळणार न्याय!

जिजाऊंचे चित्र रेखाटणाऱ्या चित्रकाराला मिळणार न्याय!

googlenewsNext

गणेश देशमुख ।
मुंबई : राजमाता मांसाहेब जिजाऊ यांचे जगातील पहिले तैलचित्र साकारणारे चित्रकार बंडू मोरे यांची उपेक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची दखल घेऊन, एकाच वेळी तीन मंत्रालयांना कार्यवाहीचे आदेश सोमवारी दिले. सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशित केलेला हा मुद्दा शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविला.
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाºया मांसाहेब जिजाऊ यांचे चित्र जगभरात कुठेच उपलब्ध नव्हते. ही कमतरता चित्रकार बंडू मोरे यांनी भरून काढली. त्यांनी इतिहासाचे वाचन करून, हाती तलवार असलेल्या मांसाहेबांचे आकर्षक तैलचित्र १९९७ साली साकारले. त्या तैलचित्राचे त्यांनी २०१३ साली स्वामित्व हक्कही (कॉपीराइट) मिळविले आहेत. मोरे यांनी साकारलेले आणि अमरावतीच्या विश्रामगृहात लावलेले मांसाहेब जिजाऊंचे हे तैलचित्र, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना खूपच भावले. त्यांच्या आदेशावरून ते मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर समारंभपूर्वक लावण्यात आले. आजही ही प्रतीमा तिथे आहे. तथापि, मोरे यांना त्या समारंभाचे ना निमंत्रण पाठविण्यात आले ना उचित मानधन देण्यात आले. मोरे यांचे हे शल्य आणि संघर्ष ‘लोकमत’ने ९ मार्चच्या अंकातून मांडला. या वृत्ताची दखल घेऊन संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीण गायकवाड यांनी ३ एप्रिल रोजी बंडू मोरे यांची अमरावतीत भेट घेतली. शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी हा मुद्दा पोहोचविला. जयंत पाटील यांनी त्याच पोटतिडकीने सोमवारी मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर भेट घेतली. बंडू मोरे यांना स्वामित्व हक्कापोटीचे एकरकमी उचित मानधन दिले जावे. शिवाय, सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून देय असलेले कलाकारांसाठीचे मासिक मानधनही त्यांना मिळावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. दोन्ही मागण्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मान्य केल्या.

मोरे यांचा सत्कार
बंडू मोरे यांच्या ऐतिहासिक कलाकृतीची दखल घेऊन, संभाजी ब्रिगेडने ३ एप्रिल रोजी अमरावतीत तत्काळ वर्गणी गोळा करून ११ हजार रुपये रोख आणि मानपत्र प्रदान केले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष श्याम नाडेकर यांनी हा छोटेखानी सत्कार घडवून आणला.
चित्रकार बंडू मोरे यांना स्वामित्व हक्कापोटीचे एकरकमी आणि कलाकारांना मिळणारे मासिक मानधन देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना केली. त्यांनी
ती मान्य केली आहे. महिनाभरात प्र्रक्रिया पूर्ण होईल.
- जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्ष

तैलचित्र पहिल्यांदा अमरावतीच्या विश्रामगृहात लावले गेल्याने, सार्वजनिक बांधकाम विभागाला, तसेच विषयाची संबंधित सामान्य प्रशासन आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालयालाही त्यांनी दोन्ही स्वरूपाचे मानधन देण्यासाठीच्या कार्यवाहीचे आदेश दिले. त्यामुळे चित्रकार मोरे यांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.

Web Title: Picture of Jijau painting will get justice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.