ग्रामीण भागात भारतीय संस्कृतीचे दर्शन

By Admin | Published: August 29, 2016 05:06 AM2016-08-29T05:06:32+5:302016-08-29T05:06:32+5:30

श्रावण महिना हा हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जात असल्याने देवळामध्ये भजन, हरिपाठ अशा धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येत असते.

The philosophy of Indian culture in rural areas | ग्रामीण भागात भारतीय संस्कृतीचे दर्शन

ग्रामीण भागात भारतीय संस्कृतीचे दर्शन

googlenewsNext

मोहोपाडा : श्रावण महिना हा हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जात असल्याने देवळामध्ये भजन, हरिपाठ अशा धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येत असते. त्याचबरोबर समाजामध्ये प्रबोधन व्हावे, शिवाय भारतीय संस्कृती जोपासली जावी या दृष्टिकोनातून खालापूर तालुक्यातील वडगाव येथे भारुडाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून विविध प्रकारच्या वेशभूषा, पात्र सादर करून ग्रामस्थांचे मनोरंजन करण्यात आले.
समाजामध्ये एकोपा टिकून राहावा, तसेच तरु ण पिढीला आपल्या परंपरेचे ज्ञान मिळावे, या विचारातून गेली तीस वर्षे वडगांव येथे भारूडरूपी पात्र काढून उपस्थितांची मने जिंकली जात आहेत. हे पात्र सादर करीत असताना आबालवृद्धांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. परिसरातील शेकडोहून अधिक ग्रामस्थांनी या कलेचा आनंद लुटला. यावेळी गणपती, छत्रपती शिवाजी महाराज, पोतराज, गोंधळी, धनगर, पोलीस, डॉक्टर, प्रधान, चोर असे विविध पात्र काढून नाटकरूपी सादर करण्यात आले. हे पात्र सादर करीत प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यातच काहींना उत्तम पात्र सादर करीत असल्यामुळे रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळत होती.
आजच्या तरु ण पिढीमध्ये ही कला जोपासली जावी, शिवाय आपल्या महाराष्ट्राला विविध संतांची परंपरा लाभली आहे. मात्र जेव्हा हेच संत आपल्या भेटीला येत असतात त्या वेळेचे त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा या नाट्यरूपी सादर करण्यात आला. मात्र आजही ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने कार्यक्र म पार पडत आहे. आपल्यामधील असलेले वैर विसरून जावे आणि समाजामध्ये एक प्रकारचे भावनिक नाते तयार व्हावे या विचारातून हे नाट्यरूपी पात्र सादर करण्यात येत असल्याचे मत हरिश्चंद्र पाटील, रमेश पाटील, एम.के.गडगे, हरिभाऊ गडगे, बबन गडगे आदींनी व्यक्त केले. (वार्ताहर)

Web Title: The philosophy of Indian culture in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.