Petrol & Diesel Prices : पेट्रोल 21 पैसे आणि डिझेल 18 पैशांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 07:41 AM2018-11-04T07:41:12+5:302018-11-04T07:44:34+5:30

Petrol & Diesel Prices : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. त्याचप्रमाणेच आजही इंधनाच्या दरात पुन्हा घट झाली आहे.

petrol and diesel rates are cut today petrol will cost 21 paise diesel 18 paise cheaper | Petrol & Diesel Prices : पेट्रोल 21 पैसे आणि डिझेल 18 पैशांनी स्वस्त

Petrol & Diesel Prices : पेट्रोल 21 पैसे आणि डिझेल 18 पैशांनी स्वस्त

मुंबई -  गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. त्याचप्रमाणेच आजही इंधनाच्या दरात पुन्हा घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात 21 पैशांची घट झाल्यानं मुंबईकरांना प्रतिलिटर पेट्रोलसाठी आता 84.28 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलच्या दरात 18 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे डिझेलचे आजचे प्रतिलिटर दर 76.88 रुपये एवढे आहेत.   

राजधानी नवी दिल्लीतही पेट्रोल 21 पैशांनी तर डिझेल 17 पैशांनी स्वस्त झाले आहे. यामुळे येथे प्रतिलिटर पेट्रोलसाठी 78.78 रुपये, तर प्रतिलिटर डिझेलसाठी 73.36 रुपये मोजावे लागणार आहेत.

(निवडणुकांसाठीच पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीचे सत्र)


मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. 6 ऑक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.

Web Title: petrol and diesel rates are cut today petrol will cost 21 paise diesel 18 paise cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.