पत्नीला धक्का लागला, पतीच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू, आरोपी पत्नीला सत्र न्यायालयाकडून जामीन

By रतींद्र नाईक | Published: December 6, 2023 12:59 AM2023-12-06T00:59:59+5:302023-12-06T01:00:36+5:30

सायन रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरील जिन्यावरून माने पतीपत्नी प्लॅटफॉर्मवर येत होते.

passenger killed by husband cause of touch to Wife, accused wife granted bail by sessions court | पत्नीला धक्का लागला, पतीच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू, आरोपी पत्नीला सत्र न्यायालयाकडून जामीन

पत्नीला धक्का लागला, पतीच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू, आरोपी पत्नीला सत्र न्यायालयाकडून जामीन

मुंबई :  पत्नीला धक्का लागला म्हणून रागाच्या भरात एका दाम्पत्याने  तरुणाला केलेल्या मारहाणीत तरुणाचा रेल्वेच्या धडकेने सायन स्थानकात मृत्यू झाला होता. या अपघाताला जबाबदार असणाऱ्या अविनाश माने आणि शीतल माने या दाम्पत्याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला, त्यापैकी शीतल हिला सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे आहे.

सायन रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरील जिन्यावरून माने पतीपत्नी प्लॅटफॉर्मवर येत होते. घणसोली येथे राहणाऱ्या दिनेश राठोड या तरुणाचा त्यावेळी शीतल माने यांना धक्का लागला. महिलेने त्याला छत्रीने मारले. मारहाण सुरू असताना अविनाश यांनी देखील त्याला मारझोड करायला सुरुवात केली. यावेळी दिनेश चा तोल गेल्याने तो रुळांवर पडला आणि लोकलच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर माने दाम्पत्याने  न्यायालयात अर्ज दाखल केला. आरोपी शीतल १६ ऑगस्ट पासून तुरुंगात असून तिच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे तपास पूर्ण झाल्याचे दिसत असून ही घटना कोणत्या परिस्थितीत घडली याचा विचार करता, खटल्याच्या प्रलंबित अवस्थेत आरोपीला ताब्यात ठेवणे योग्य ठरणार नाही असे मत न्यायालयाने नोंदवले व तिचा जामीन अर्ज मंजूर केला दरम्यान पतीच्या जामीन अर्जावर अद्याप सुनावणी झालेली नाही.

Web Title: passenger killed by husband cause of touch to Wife, accused wife granted bail by sessions court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.