परळ स्थानकातील गर्दीचा प्रश्न मार्गी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 06:32 AM2018-06-18T06:32:33+5:302018-06-18T06:32:33+5:30

तब्बल १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या परळ स्थानकातील नवीन फलाटासह रुळांचे काम रविवारी पूर्ण झाले.

Pale railway station crowded question! | परळ स्थानकातील गर्दीचा प्रश्न मार्गी!

परळ स्थानकातील गर्दीचा प्रश्न मार्गी!

Next

मुंबई : तब्बल १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या परळ स्थानकातील नवीन फलाटासह रुळांचे काम रविवारी पूर्ण झाले. यामुळे परळ स्थानकातील गर्दीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. नव्या फलाटाचे काम पूर्ण झाल्यामुळे परळ टर्मिनसच्या कामांनादेखील गती मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, दादर स्थानकातील लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी लवकरच परळ टर्मिनस येथून लोकल धावतील. परळ येथील नव्या फलाटामुळे नवीन आणि जुना फलाट दोन्ही प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. परळ स्थानकाला जोडून पश्चिम रेल्वेचे एल्फिन्स्टन स्थानक आहे. यामुळे नव्या फलाटाचा फायदा मध्य रेल्वेच्या प्रवाशांसह पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनादेखील होईल.
>३.५ लाख प्रवाशांना होणार फायदा
परळ आणि एल्फिन्स्टन स्थानकातून ३.५ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. शहरातील मध्यवर्ती ठिकाण अशी ओळख असल्याने परळ परिसरात विविध कार्यालयांनी आपले बस्तान बसवले. त्याचबरोबर शहरातील मुख्य रुग्णालये परळमध्ये स्थित आहेत.स्थानिकांसह रुग्णांच्या नातेवाइकांना प्रवासासाठी याचा विशेष फायदा होईल. स्थानकात सीएसएमटी दिशेकडील निमुळत्या पायºयांवरील गर्दी कमी झाल्याने भविष्यात एल्फिन्स्टन दुर्घटनेसारख्या घटनांना आळा बसेल.
>प्रमुख तरतुदी
सीएसएमटी-कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका
परळ टर्मिनस
ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका
हार्बर मार्गाचे गोरेगावपर्यंत विस्तारीकरण
>परळ स्थानकातील नवीन फलाट
सद्य:स्थितीत असलेल्या फलाटांच्या पश्चिम दिशेला नवीन फलाट तयार आहे.
कसारा, कर्जत दिशेला जाणाºया लोकल नव्या फलाटातून मार्गस्थ होतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक सद्य:स्थितीनुसार ‘जैसे थे’ राहणार आहे.
परळ टर्मिनस अंतर्गत असलेल्या कामांपैकी नवीन फलाटाचे काम पूर्ण झाल्याने परळ टर्मिनसच्या कामालादेखील गती मिळणार आहे. प्रकल्पाची किंमत ५१ कोटी आहे.
जुन्या आणि नव्या फलाटाला जोडणारे तात्पुरत्या स्वरूपाचे तीन मेटल डेक
>सीएसएमटी-कल्याण लोकल रवाना
परळ स्थानकातील नवीन फलाटांच्या रुळांचे तांत्रिक कामासाठी घेण्यात आलेला ब्लॉक वेळेनूसार पूर्ण केला. प्रवाशांच्या सुविधा उन्नत करण्यासाठी ब्लॉक आवश्यक होता. मुंबई उपनगरीय रेल्वेवर नवीन फलाट दाखल झाला आहे. परळच्या नव्या फलाटातून सीएसएमटी-कल्याण ही पहिली लोकल रवाना करण्यात आली.
- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
>नवीन फलाटाची वैशिष्ट्ये
>300
मीटर लांबी, 10
मीटर रुंदी, 15
बोगींच्या लोकलसाठी योग्य फलाट, 3 तात्पुरत्या स्वरूपाच्या लोखंडी पुलांनी जुना आणि नवा फलाट जोडणार, 3पादचारी पुलांपैकी २ पादचारी पुलांची जोडणी

Web Title: Pale railway station crowded question!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.