पावसाअभावी भात शेती धोक्यात

By Admin | Published: July 2, 2015 11:34 PM2015-07-02T23:34:43+5:302015-07-02T23:34:43+5:30

तालुक्यातील भातशेती पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. माळरानावरील भाताची रोपे सुकू लागली असून, आणखी काही दिवस पावसाने दडी मारल्यास

Paddy cultivation risk due to lack of rain | पावसाअभावी भात शेती धोक्यात

पावसाअभावी भात शेती धोक्यात

googlenewsNext

कर्जत : तालुक्यातील भातशेती पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. माळरानावरील भाताची रोपे सुकू लागली असून, आणखी काही दिवस पावसाने दडी मारल्यास शेतकरी वर्गावर तिसऱ्यांदा पेरणीचे संकट येऊ शकते. काहींनी दोन वेळा पेरणीही केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कर्जतमध्ये फार्महाऊस येण्याआधी तालुक्यात २८ हजार हेक्टर जमिनीवर भातशेती केली जायची. मात्र खर्च आणि उत्पन्न याचा मेळ साधता येत नसल्याने आर्थिक कोंडी होऊ लागली त्यामधून वाट काढण्यासाठी जमिनीचा तुकडा विकण्यास सुरु वात झाली आणि प्रामुख्याने भाताचे क्षेत्र कमी होऊ लागले. आज खरीप हंगामात होत असलेली भाताची शेती ही जेमतेम दहा हजार हेक्टर आहे. हा घसरता आलेख तसाच राहिल्यास कर्जत तालुका पूर्वी भातासाठी ओळखला जायचा हे पटवून द्यावे लागेल.
मजुरांमुळे अधीच अडचणीत सापडलेल्या बळीराजाच्या चिंतेत आता आणखी भर पडली आहे. यंदा उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे शेतामध्ये राब पेरण्यास उशीर झाला होता.त्यामुळे लावणीसाठी २०-२२ दिवसात तयार होणारे रोप हे नंतरच्या काळात पावसाच्या अनियमतिपणामुळे वेळेत तयार झालेले नाहीत. वेळेत लावणीची कामे सुरू झाली नाहीत. तर पावसाने गेली आठ दिवस घेतलेल्या विश्रांतीमुळे बळीराजा आणखीनच अडचणीत आला आहे. जून महिन्याच्या अखेरीस शेतामध्ये हिरवेगार दिसणारे भाताचे रोप आता सुकू लागले आहे. अशी स्थिती राहिल्यास दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. (वार्ताहर)

Web Title: Paddy cultivation risk due to lack of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.