अंगणवाडी सेविका शोधणार शाळाबाह्य मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:02 AM2018-11-02T01:02:32+5:302018-11-02T01:03:03+5:30

मुंबईतून आत्तापर्यंत एकूण ३७०८ मुले शिक्षणाच्या प्रवाहात; वाहतूक पोलीस आणि रेल्वेही करणार बालरक्षकांना मदत

Out-of-school children looking for Anganwadi workers | अंगणवाडी सेविका शोधणार शाळाबाह्य मुले

अंगणवाडी सेविका शोधणार शाळाबाह्य मुले

googlenewsNext

मुंबई : शाळाबाह्य मुले शाळेत दाखल करताना शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो़. यामुळे बालरक्षक चळवळ अधिक कार्यक्षम व्हावी यासाठी मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बालरक्षक आधार समिती गठीत केली आहे. त्याची पहिली बैठक गुरुवारी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. सदर बैठकीत प्रत्येक महिन्यातील पहिला शनिवार बालरक्षक व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जावा, असे एकमताने ठरविण्यात आले आहे. परिणामी, शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेला वेग आणि वेळ प्राप्त होणार आहे.

बालरक्षक आधार समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त उपाध्यक्ष, वाहतूक पोलीस उपायुक्त, अपर पोलीस आयुक्त, महापालिका शिक्षण उपायुक्त, महापालिका शिक्षणाधिकारी अशा १७ सदस्यांंचा समावेश आहे. वाहतूक सिग्नलवर भीक मागणारी मुले व वस्तू विकणाºया मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षकांना अपेक्षित सहकार्य कसे करावे याबद्दल वाहतूक पोलिसांना निर्देश देण्यात आले. रेल्वेमध्ये वस्तू विकणारी मुले व स्थलांतरित होऊन येणारी मुले यासाठी अपर पोलीस आयुक्त रेल्वे यांच्या विभागाशीही पत्रव्यवहार केला जाणार आहे.

मुंबई शहरातील सर्व बालरक्षकांनी आत्तापर्यंत या शैक्षणिक वर्षांत मुंबई शहरातील (दक्षिण विभागातील) एकूण १३९३ तर उपनगरातील २३१५ शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. मुंबई विभागातून एकूण ३७०८ शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात बालरक्षकांनी आणले आहे. यातील ३१२८ मुले पालिका कार्यक्षेत्रातील तर ५८ डीवायडी क्षेत्रातील आहेत. शाळाबाह्य मुलांसाठी बालरक्षक शिक्षक उत्तम काम करत असून नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणाºया बाल संरक्षण समितीमध्ये एक बालरक्षक घेणेबाबत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मुंबई उपसंचालक विभागाच्या बालरक्षक जिल्हा समन्वयक वैशाली शिंदे यांनी दिली.
सेक्सवर्कर्सच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वयंसेवी संस्थांशी चर्चा करून त्यांना शाळेत आणण्याबाबत नियोजन कसे करता येईल यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

प्रवासात वस्तू विकणारी मुलेही शिकणार
मुंबई विभागातून एकूण ३७०८ शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात बालरक्षकांनी आणले आहे. यातील ३१२८ मुले पालिका कार्यक्षेत्रातील तर ५८ डीवायडी क्षेत्रातील आहेत.
रेल्वेमध्ये वस्तू विकणारी मुले व स्थलांतरित होऊन येणारी मुले यासाठी अपर पोलीस आयुक्त रेल्वे यांच्या विभागाशीही पत्रव्यवहार केला जाणार आहे.
नसल्याने वर्षानुवर्षे कोटा पूर्ण केला जात नाही.

Web Title: Out-of-school children looking for Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.