पालिकेकडून मुंबई बाहेरील रुग्णांना स्वतंत्र शुल्क आकारणीला विरोध

By मनोहर कुंभेजकर | Published: February 4, 2024 08:34 PM2024-02-04T20:34:35+5:302024-02-04T20:34:49+5:30

महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुतुला यांचा इशारा

Opposition to separate charges for patients outside Mumbai by the municipality | पालिकेकडून मुंबई बाहेरील रुग्णांना स्वतंत्र शुल्क आकारणीला विरोध

पालिकेकडून मुंबई बाहेरील रुग्णांना स्वतंत्र शुल्क आकारणीला विरोध

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील रुग्णांना सुध्दा उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या जातात. मुंबईकरांकडून प्राप्त होणाऱ्या कर शुल्कातून बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असल्याने महाराष्ट्राबाहेरुन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र शुल्क रचना लागू करण्याबाबत या शक्यतेची सुध्दा चाचपणी पालिका करेल, असे सूतोवाच मुंबई महापालिका अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

 ही बाब आक्षेपार्ह व अन्यायकारक असून याला महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुतुला यांचा  विरोध केला आहे.याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना पत्र देत हे मनपा आयुक्त चहल 2024-25 मधील बजट प्रस्थाव देत जाहीर केलेल्या सदर ठराव रद्द करण्याची मागणी केली आहे.रुग्णला परप्रांतीय म्हणून नाहीं तर माणूस म्हणून मनपाने बघावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

आपण या संदर्भात येत्या बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.

मुंबई महापालिकेचा गेल्या शुक्रवारी सादर झालेला अर्थसंकल्पातील ही तरतूद असमाधान व्यक्त करणारी आहे. परप्रांतीय म्हणून तुम्हीं आरोग्यासाठी स्वतंत्र शुल्क रचना लागू  करण्याचा निर्णय अतिशय चुकीचे आहे. रुग्ण हा माणूसच असून त्याला स्वस्थ जगण्याचे अधिकार संविधानाने दिले आहे त्यात तुम्हीं कोण त्याचे मोल भाव लावणारे ? असा सवाल त्यांनी केला आहे.मनपाने आहे त्यात सुदृढ सेवा न देता वीनाकारण नवे प्रातीय प्रयोग करणे बंद करा असे खडेबोल देखिल भिमेश मुतुला यांनी पालिका प्रशासनाला सुनावले आहे.

 रुग्ण हा कुठला प्रांताचा नसतो आयुष्य जगण्याच्या इर्षेत आणि आपल्याला चांगले उपचार मिळण्यासाठी तो मुंबईच्या रुग्णालयात तो धाव घेतो. मुंबईमुळे दर वर्षी पालिकेत येणाऱ्या गरजू  रुग्णांना मोठा दिलासा मिळून त्यांचे आयुष्यमान उंचावते. या बाबतीत महायुती सरकारने मानवतेचा दृष्टीने तातडीने सकारात्मक विचार करून पालिका प्रशासनाला सदर चुकीचा निर्णय मागे घ्यायला भाग पाडावे अशी आग्रही मागणी मुतुला यांनी केली आहे.

Web Title: Opposition to separate charges for patients outside Mumbai by the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.