‘पद्मावती’ला मराठा महासंघाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:23 AM2017-11-20T01:23:47+5:302017-11-20T01:24:15+5:30

मुंबई : राणी पद्मावती यांच्या जीवनावर आधारित ‘पद्मावती’ चित्रपटाला होणा-या विरोधात आता मराठा महासंघानेही उडी घेतली आहे.

Opposition to the Padmavati Maratha Federation | ‘पद्मावती’ला मराठा महासंघाचा विरोध

‘पद्मावती’ला मराठा महासंघाचा विरोध

googlenewsNext

मुंबई : राणी पद्मावती यांच्या जीवनावर आधारित ‘पद्मावती’ चित्रपटाला होणा-या विरोधात आता मराठा महासंघानेही उडी घेतली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाने चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात सोमवारी, २० नोव्हेंबरला दुपारी १ वाजता आझाद मैदानात निषेध आंदोलनाची हाक दिली आहे.
महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी सांगितले की, महासंघ आणि अखिल भारतीय क्षत्रिय महासभेतर्फे संयुक्तपणे सोमवारी आझाद मैदानात निषेध नोंदविण्यात येईल.
राणी पद्मावतींच्या सुवर्ण इतिहासाची विटंबना करण्याचे काम दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटाच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही चित्रपटगृहात या चित्रपटाचे प्रदर्शन करू नये, यासाठी शांततामय मार्गाने हे विरोध प्रदर्शन असेल. मात्र, शासनाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे. दरम्यान सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकरण्यात आल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे़

Web Title: Opposition to the Padmavati Maratha Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.