स्मारकासाठी भाजपाची केवळ ‘तारीख पे तारीख’ - सचिन अहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 02:15 AM2017-12-07T02:15:47+5:302017-12-07T02:15:57+5:30

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा विषय सत्ताधारी भाजपासाठी केवळ राजकारणाचा मुद्दा बनला आहे.

Only the date of the date for the memorial of the BJP - Sachin Ahir | स्मारकासाठी भाजपाची केवळ ‘तारीख पे तारीख’ - सचिन अहिर

स्मारकासाठी भाजपाची केवळ ‘तारीख पे तारीख’ - सचिन अहिर

Next

मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा विषय सत्ताधारी भाजपासाठी केवळ राजकारणाचा मुद्दा बनला आहे. भूमिपूजनाला दोन वर्षे झाली, तरी स्मारकाचे काम सुरू झाले नाही. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनापूर्वी थातूरमातूर कारणे देत वेळ मारून नेली जाते. बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत भाजपा सरकार फक्त तारीख पे तारीख देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली.
इंदू मिल परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी देशवासीयांची इच्छा आहे. स्मारकाकडे साºया देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार याबाबत केवळ वेळकाढूपणा करीत आहे. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनापूर्वी काहीतरी थातूरमातूर कारणे सांगून सरकार वेळ मारून नेली जात आहे. गेल्या वर्षी महापरिनिर्वाण दिनाच्या चार दिवस आधी इंदू मिलमध्ये एमएमआरडीएने पाडकामाला सुरुवात केल्याचा दिखावा केला होता. तेव्हा भाजपाच्या अतिउत्साही नेत्यांनी स्मारकाचे काम सुरू झाल्याचा दावाही केला होता. यंदाही महिन्याभरात स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. मात्र, आजवरचा अनुभव पाहता, तारखा देण्याव्यतिरिक्त या सरकारने काहीच केलेले नाही. जनतेच्या भावनांशी उगाच खेळ करत, आश्वासनांचे राजकारण करण्यापेक्षा सरकारने स्मारक उभारण्यासाठी खरोखरच काहीतरी हालचाली कराव्यात, असा टोलाही अहिर यांनी लगावला.

सत्ताधाºयांनी जनतेची माफी मागावी
‘ओखी’ चक्रिवादळाची पूर्वकल्पना असतानाही प्रशासनाने पुरेशी खबरदारी न घेतल्याने, लाखो भीमसैनिकांना हकनाक झालेल्या त्रासाबद्दल मुंबई महापालिका आणि राज्यातील सत्ताधाºयांनी आंबेडकरी जनतेची माफी मागावी, अशी मागणीही सचिन अहिर यांनी या वेळी केली.

Web Title: Only the date of the date for the memorial of the BJP - Sachin Ahir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा