बीकेसीत दोन गटांतील हाणामारीत एकाचा मृत्यू; पोलिसांकडून सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 04:32 AM2019-06-02T04:32:34+5:302019-06-02T04:32:43+5:30

शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास वांद्रे पूर्वच्या भारतनगर झोपडपट्टीमध्ये हा प्रकार घडला. येथील रहिवासी आणि स्थानिक नामांकित विकासक यांच्यात संपत्तीवरून काही वाद सुरू आहेत

One killed in two groups in BKC; Police arrest seven people | बीकेसीत दोन गटांतील हाणामारीत एकाचा मृत्यू; पोलिसांकडून सात जणांना अटक

बीकेसीत दोन गटांतील हाणामारीत एकाचा मृत्यू; पोलिसांकडून सात जणांना अटक

googlenewsNext

मुंबई : फेसबुकवर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याचा राग मनात धरत दोन गटांत झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री हा प्रकार वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात घडला. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास वांद्रे पूर्वच्या भारतनगर झोपडपट्टीमध्ये हा प्रकार घडला. येथील रहिवासी आणि स्थानिक नामांकित विकासक यांच्यात संपत्तीवरून काही वाद सुरू आहेत. फिर्यादी मोहम्मद रफिक अब्दुल सत्तार सय्यद यांनी संबंधित विकासक आणि स्थानिक नगरसेविका यांच्या विरोधात बदनामीकारक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता.

त्या रागात काही लोकांनी सय्यद आणि त्यांचे सहकारी अमीर दातार शेख उर्फ बाबूभाई यांना लाकडी बांबू व लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात सय्यद, बाबूभाई आणि त्यांचे साथी तारिक शौकत अली खान हे जखमी झाले. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र बाबूभाई यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्यानुसार त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी सात जणांना अटकही करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर भारतनगर परिसरात तणावाचे वातावरण असून या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: One killed in two groups in BKC; Police arrest seven people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.